वॉशिंग्टन - कोरोनाच्या (Corona) साथीच्या सुरुवातीच्या दिवसांत अमेरिकेला (America) भारताने (India) आधार (Support) दिला. भारताची साथ अमेरिका कधीही विसरणार नाही. सध्या भारतात कठीण परिस्थिती असताना आम्ही तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Antony Blinkon) यांनी दिली. (United States will never Forget Indias Support Antony Blinkon)
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मुख्यालयात त्यांनी शुक्रवारी त्यांनी (ता. २८) ब्लिंकन यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ब्लिंकन यांनी कोरोनाच्या साथीत भारताने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. आता भारताला मदत करण्याची आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. कोरोनाशी लढण्याच्या कठीण काळात अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीबद्दल व ऐक्यभावाबदद्दल अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाचे आभार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मानले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याबरोबर विविध मुद्दांवर चर्चा झाल्याचे सांगत गेल्या काही वर्षांत भारत व अमेरिकेचे संबंध मजबूत झाले असून यापुढेही ते तसेच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात जयशंकर यांचे स्वागत करून ब्लिंकन म्हणाले, ‘सध्याच्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अमेरिका व भारत एकत्रित काम करीत आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात एकत्र आहोत. जागतिक तापमान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकत्र तोंड देत आहोत. आम्ही ‘क्वाड’ आणि संयुक्त राष्ट्रां (यूएन)तील विविध संघटनांच्या माध्यमांतून भारत व अमेरिकेची थेट भागीदार आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत’
मुख्यालयाला भेट देणारे तिसरे परराष्ट्रमंत्री
ज्यो बायडेन हे अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेला भेट देणारे जयशंकर हे पहिले भारतीय मंत्री आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा करण्यासाठी फॉगी बॉटम येथील मुख्यालयाला भेट देणारे जयशंकर हे तिसरे परराष्ट्र मंत्री ठरले. यापूर्वी जॉर्डनचे अयमान सफदी आणि कोलंबियाचे परराष्ट्रमंत्री मार्टा लुसिया रामीरेझ यांनी या कार्यालयात ब्लिंकन यांची भेट घेतली आहे. भारतीय शिष्टमंडळात भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू, सहसचिव शिल्पक अंबुले, मोहीम उपप्रमुख सुधाकर दलेला, सचिव चित्रांगनासिंह यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.