UP Election 2022 : बाँबहल्ल्यात अणु प्रकल्पाला आग

रशियाचे प्रकल्पावर नियंत्रण; आग आटोक्यात
 Fire nuclear plant Bombay
Fire nuclear plant Bombaysakal
Updated on

किव्ह: रशियाने आज केलेल्या बाँबफेकीनंतर युरोपमधील सर्वांत मोठा अणु प्रकल्प असलेल्या युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया प्रकल्पामध्ये आग लागली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली असून या अणु प्रकल्पावर रशियाने ताबाही मिळविला आहे. मात्र, अणु प्रकल्पावरील बाँबफेकीमुळे किरणोत्सर्ग होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 Fire nuclear plant Bombay
Russia-Ukraine : ऑपरेशन गंगा’वर ‘स्वराज’नितीची छाप

रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस होता. रशियाकडून युक्रेनच्या दक्षिण, पूर्व आणि दक्षिण भागातील शहरांवर जोरदार हल्ले सुरुच आहेत. आज रशियाने दक्षिण भागातील एनरहोदर शहरावर जोरदार हल्ले केले. या शहरातील झॅपोरिझ्झिया या अणु प्रकल्पावरही रशियाच्या सैन्याने बाँबवर्षाव केला. हा युरोपमधील सर्वांत मोठा अणु प्रकल्प आहे. येथे सहा अणुभट्ट्या आहेत. रशियाने रात्रीतून केलेल्या बाँब वर्षावावेळी एक तोफगोळा एका अणुभट्टीजवळ येऊन पडला आणि तिथे आग लागली. या अणुभट्टीची पुनर्बांधणी सुरु असून त्यामुळे ती कार्यान्वित नसल्याने मोठी हानी टळली. ही आग नंतर आटोक्यात आणली गेली. फारसा विरोध न होता हा अणु प्रकल्प रशियाच्या ताब्यात गेला.

 Fire nuclear plant Bombay
Russia-Ukraine : अमेरिका लादणार भारतावर निर्बंध?

बाँबहल्ल्यामुळे किंवा आगीमुळे अणु प्रकल्पाचे फारसे नुकसान झाले नसले तरी यामुळे युद्धाचे गांभीर्य वाढले आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी तातडीने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि इतर जागरिक नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना परिस्थितीची माहिती दिली. युक्रेनमधील ऊर्जा केंद्रांवर हल्ले करून वीज तोडण्याचा रशियाचा प्रयत्न असून त्यादृष्टीनेच हल्ले होत असल्याचे चित्र आहे.

 Fire nuclear plant Bombay
Russia Ukraine War l काँग्रेसच्या निशाण्यावर केंद्र सरकार; म्हणाले...

तूर्त धोका नाही

हल्ल्यानंतर किरणोत्सर्ग नसल्याने तूर्त धोका नाही

हल्ल्यानंतर संपूर्ण अणु प्रकल्प बंद

आग पूर्ण आटोक्यात

ऑख्तिर्का येथील अणु प्रकल्पाचे रशियाच्या हल्ल्यात नुकसान

दक्षिण आघाडीवर आगेकूच

युक्रेनवरील आक्रमणात रशियाला उत्तर भागात फारसे यश अद्याप मिळालेले नाही. राजधानी किव्ह आणि खारकिव्ह या दोन मोठ्या शहरांवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बाँब वर्षाव करूनही ही शहरे रशियाला ताब्यात घेता आलेली नाहीत. या शहरांमधील इमारतींचे मोठे नुकसान या बाँबवर्षावात झाले. दक्षिण भागात मात्र त्यांनी आगेकूच केली असून येथे त्यांना तुलनेने कमी प्रतिकार होत आहे. दक्षिणेकडील क्रिमिया हा प्रदेश रशियाने आठ वर्षांपूर्वीच ताब्यात घेतला असल्याने त्यांच्या सैन्याला येथून मिळालेल्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी ही आगेकूच केल्याचे सूत्रांनी सांगितले.

 Fire nuclear plant Bombay
Russia Ukraine War : भारताचा चौथ्यांदा रशियाच्या विरोधात बोलण्यास नकार

‘चेर्नोबिल’मधील कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव

बर्लिन : रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीचा ताबा घेतल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांना याच प्रकल्पात थांबण्याची सक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने केला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर अणु प्रकल्पात अत्यंत जोखमीची जबाबदारी असते. त्यांचा असा छळ झाल्यास आणि त्यांना प्रचंड राबवून घेतल्यास कामावर परिणाम होऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुरेसा आराम मिळू द्यावा, असे आवाहन अणुऊर्जा संस्थेने केले आहे.

किरणोत्सर्गाचा मोठा धोका : झेलेन्स्की

किव्ह : रशियाच्या सैनिकांनी अणु प्रकल्पावर तोफगोळ्यांचा मारा केल्यामुळे या ठिकाणाहून मोठा किरणोत्सर्ग होण्याचा धोका असल्याचा इशारा अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि आंतरराष्ट्रीय अणुसंस्थेने दिला असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज दिली. या अणु प्रकल्पात स्फोट झाला तर तो आपल्या सर्वांचा आणि युरोपचाही शेवट असेल. संपूर्ण युरोपच आपल्याला सोडून द्यावा लागेल, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला. त्यामुळे अधिक हानी टाळण्यासाठी युरोपने तातडीने हस्तक्षेप करून रशियन सैनिकांना रोखावे, अशी विनंतीही झेलेन्स्की यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.