America Divorce Rate : वेगाने वाढतोय घटस्फोटाचा दर; फोर्ब्सच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

Divorce Rate : अमेरिकेतील एकूण घटस्फोटांपैकी 73 टक्के प्रकरणांमध्ये हा निर्णय दोघांपैकी एकाच व्यक्तीचा होता.
America Divorce Rate
America Divorce RateeSakal
Updated on

जगभरात लग्नाचं बंधन हे अगदी पवित्र मानलं जातं. केवळ हिंदू संस्कृतीतच नाही, तर इतर धर्मांमध्येही या नात्याला पवित्र मानलं गेलं आहे. लग्नाच्या जोड्या या स्वर्गात जुळतात असं म्हटलं जातं. मात्र, कित्येक वेळा काही कारणास्तव हे नातं थांबवावं लागतं. भारतात घटस्फोटांचं प्रमाण तेवढं जास्त नसलं, तरी पाश्चात्य देशांमध्ये हे भरपूर प्रणामात दिसून येतं.

अमेरिकेत सध्या घटस्फोटाचं प्रमाण भरपूर वाढताना दिसत आहे. फोर्ब्स संस्थेने केलेल्या एका रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे. या अहवालात घटस्फोटांची वाढलेली टक्केवारी आणि त्याची कारणं दिली आहेत. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

America Divorce Rate
Sleep Divorce म्हणजे काय? ज्याच्या मदतीने जोडपी नातं सुधारण्याचा प्रयत्न करतात, याची गरज कुठे पडते? जाणून घ्या

एका व्यक्तीचा निर्णय

फोर्ब्सच्या अहवालात असं समोर आलं, की अमेरिकेतील एकूण घटस्फोटांपैकी 73 टक्के प्रकरणांमध्ये हा निर्णय दोघांपैकी एकाच व्यक्तीचा होता. केवळ 27 टक्के घटनांमध्ये पती-पत्नीने चर्चा करून याबाबत निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं. आधी घटस्फोट झालेल्या व्यक्तींचा दुसऱ्यांदाही घटस्फोट होण्याचं प्रमाण 92 टक्के होतं.

कोणत्या वर्षी घटस्फोट?

एकूण घटस्फोटांपैकी बहुतांश प्रकरणं ही लग्नाच्या तिसऱ्या ते सातव्या वर्षांमध्ये दिसून आली. 4 टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीने एकमेकांसोबत 10 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला होता. (Global News)

America Divorce Rate
Divorced Photoshoot : नवऱ्याने दिला घटस्फोट; बायकोने फोटोशूट करत साजरा केला आनंद

पटत नाही म्हणून घटस्फोट

घटस्फोटांमध्ये एकमेकांशी न पटणं, कुटुंबीयांची नापसंती, एकमेकांची फसवणूक किंवा विवाहबाह्य संबंध अशा कारणांचा समावेश होता. ज्यांचा लग्नानंतर पहिल्याच वर्षात घटस्फोट झाला, त्यांपैकी 59 टक्के प्रकरणांमध्ये एकमेकांशी न पटणं हे कारण होतं. तर, 34 टक्के घटस्फोट हे विवाहबाह्य संबंधांमुळे झाले.

टळू शकले असते घटस्फोट

63 टक्के लोकांनी म्हटलं, की जर त्यांना लग्नाशी संबंधित वचनं आणि जबाबदाऱ्या यांची गांभीर्याने जाण असती, तर घटस्फोट टाळता येऊ शकत होता. जर लग्नानंतर पहिल्या वर्षातच काही गोष्टींवर नीट बोलणं, चर्चा झाली असती, तर घटस्फोट टळला असता असंही कित्येकांनी मान्य केलं.

America Divorce Rate
Divorce Rate : जगात सर्वाधिक लग्न फक्त भारतातच टिकतात; आकडेवारी वाचलीत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()