वॉशिंग्टन - सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशत पसरली आहे. या वातावरणातही जगात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र अमेरिकेतील नेशविल इथं ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु असताना स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की यामुळे काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसंच तिघेजण गंभीर जखमीही झाल्याचे समजते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने असा दावा केला आहे की, हा स्फोट घडवून आणला गेला आहे. तसंच पोलिसांनी म्हटलं की, स्फोटासाठी गाडीचा वापर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एफबीआय करत आहे. या स्फोटाचा व्हिडिओ रॉयटर्स वृत्तसंस्थेनं प्रसारीत केला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार अद्याप या स्फोटाची कोणत्याही संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. तर एफबीआयने या स्फोटाबाबत माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलर्सचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
स्फोट प्रत्यक्ष पाहिलेल्या एका व्यक्तीने फेसबुक पोस्टवरून घटनेचं वर्णन केलं आहे. त्यानं म्हटलं की, स्फोट इतका भयानक होता की गाड्या हवेत उडाल्या. स्फोटामुळे गाड्यांचा अक्षऱश चुराडा झाला आणि बाजूला असलेली झाडेही उन्मळून पडली. दरम्यान, अद्याप स्फोट कुणी घडवून आणला हे समजू शकलेलं नाही.
सुदैवाने गर्दी कमी असल्यामुळे या स्फोटात जिवितहानी झाली नाही. ज्याठिकाणी स्फोट झाला तो वर्दळीचा असून पर्यटकांचे आकर्षण असलेला आहे. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनवेळी झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.