26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली वाढल्या, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची मोठी माहिती

Tahawwur Rana
Tahawwur Rana
Updated on

अमेरिकी न्यायालयाने तहव्वूर राणा यांची रिट फेटाळली आहे. अमेरिकन कोर्टाच्या निर्णयामुळे राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळू शकतो. राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आहे. 2008 मध्ये भारतात झालेल्या 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग आढळून आला आहे. राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अमेरिकेला विनंती केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी महत्वाचे विधान केले आहे.

26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे. प्रत्यार्पणाच्या (आरोपीला त्याच्या देशाच्या स्वाधीन करण्याची कृती) प्रलंबित प्रकरणावर मी भाष्य करणार नाही. मला खात्री आहे की न्याय विभाग प्रत्यार्पण प्रकरणात आवश्यक असलेल्या विशिष्ट चरणांची रूपरेषा आखू शकेल, असे परराष्ट्र विभागाचे मुख्य उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे. (latest marathi news)

वेदांत पटेल पुढे म्हणाले, "आम्ही जगभरातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध असून 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी करत आहोत."

उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान तहव्वूर राणा लवकरच भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते.

Tahawwur Rana
Nagpur News : चांगल्या कामांमुळे पोटदुखी, भांडणे लावण्याचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे

मे महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनीही म्हटले होते की, अमेरिकेच्या न्यायालयाने तहव्वूर राणाला प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. हे एक प्रकारचे सहकार्य आहे जिथे दोन्ही देश दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र काम करत आहेत आणि आम्ही थांबणार नाही.

मुंबई हल्ला प्रकरणी भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. 26/11 हल्ल्यातपाकिस्तानी दहशतवाद्यांनी 60 तासांहून अधिक काळ मुंबईला वेढा घातला होता. तसेच त्यांनी प्रमुख ठिकाणांवर हल्ले केले.

या हल्ल्यात अमेरिकनांसह 160 हून अधिक लोक मारले गेले होते. राणाने त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली याच्यासोबत पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी हल्ले करण्यासाठी मदत करण्याचा कट रचला, असा आरोप भारतीय अधिकाऱ्यांनी केला होता.

Tahawwur Rana
Nana Patole : ''पूर्वी ईडीचं सरकार होतं आता येड्यांचं सरकार'' ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.