रशिया तुमच्या मदतीला धावून येईल ही अपेक्षा ठेवू नका, अमेरिकेचा भारताला इशारा

'जगाला युद्धात ढकलणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे कोणत्याही देशाकडून उल्लंघन होऊ नये'
Joe Biden - Narendra Modi
Joe Biden - Narendra ModiTeam eSakal
Updated on

नवी दिल्ली : भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यास अमेरिका (America) उत्सुक नाही. युक्रेनवरील हल्ले सुरु झाल्यानंतर रशियावर जगभरातून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करु नये, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग (Daleep Singh) यांनी दिला आहे. सिंग सध्या भारताच्या (India) दौऱ्यावर आहेत. रशियावर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमागे महत्त्वाची भूमिका दलिप सिंग यांनी बजावली आहे. ते भारतीय वंशाचे असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. युक्रेन (Ukraine) - रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताबरोबर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर ते आले आहेत. या प्रसंगी सिंग प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (US Deputy National Security Advisor Daleep Singh Warn India, Don't Expect From Russia, If China)

Joe Biden - Narendra Modi
युक्रेनमध्ये आताही ५० भारतीय अडकलेलेच, मात्र काहीच जण मायदेशी परतण्यास तयार

ते म्हणाले, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यास रशिया तुमची बाजू घेईल, अशी मूळीच अपेक्षा ठेवू नका. कारण रशिया (Russia) आणि चीन हे चांगले मित्र झाले आहेत. जगाला युद्धात ढकलणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे कोणत्याही देशाकडून उल्लंघन होऊ नये, असे आम्हाला वाटते.

Joe Biden - Narendra Modi
श्रीलंकेची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, प्रत्येक दिवशी १० तास वीज गायब

भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही विपरित घडलेले नाही. मात्र जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या पायाभूत तत्त्वे अबाधित राहावे यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सिंग म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()