US Election 2020: ट्रम्प मारू शकतात बाजी; मोठी आघाडी असूनही बायडेन यांच्यासमोर आव्हान

US_Biden_Trump
US_Biden_Trump
Updated on

US Election 2020 : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय काही पावले दूर राहिला आहे. दरम्यान, ट्रम्प मागे पडले असून त्यांच्या हातून मिशिगन आणि विस्कॉन्सिनच्या जागाही गेल्या आहेत. 2016 मध्ये ट्रम्प यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार जो बायडेन यांनी मोठी आघाडी घेतली असून त्यांना विक्रमी मतेही मिळाली आहेत. दरम्यान, अमेरिकेत ट्रम्प समर्थक आणि विरोधक आमने सामने आले असून त्यांच्यातील वादाला हिंसक वळण लागलं आहे. आतापर्यंत 60 जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार 253 इलेक्टोरल मते बायडेन यांनी जिंकली असून ट्रम्प यांना 201 मते मिळाली आहेत. याशिवाय बायडेन यांनी त्यांच्याच पक्षाचे बराक ओबामा यांचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत बायडेन यांनी 7 कोटी 10 लाख पॉप्युलर मते मिळवली होती. ओबामा यांना 2008 मध्ये 6 कोटी 94 लाख 98 हजार 516 पॉप्युलर मते मिळाली होती.

ट्रम्प यांना बहुमत मिळवण्यासाठी अद्याप 53 इलेक्टोरल मते हवी आहेत. अजुनही चार राज्यांमधील मतमोजणी सुरू आहे. यामध्ये तीन राज्ये ट्रम्प यांनी जिंकली, तर ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. यामध्ये पेन्सिलवेनियाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर बायडेन यांनी फक्त पेन्सिल्वेनियामध्ये विजय मिळवला तरी ते राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होऊ शकतात. जर पेन्सिल्वेनियामध्ये विजय मिळवता आला नाही, तर बायडेन यांना नेवादा, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय गरजेचा आहे. मात्र यातील नेवादा वगळता इतर ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचा दबदबा आहे.

न्यूयॉर्क टाइम्सनुसार अद्याप अलास्का, एरिझोना, नेवादासह काही राज्यांमधील आकडेवारी स्पष्ट झालेली नाही. मतमोजणी सुरू असून यात अलास्का (3), एरिझोना (11), नेवादा (6), नॉर्थ कॅरोलिना (15), जॉर्जिया (16) आणि पेन्सिल्वेनिया (20) चा समावेश आहे.

दरम्यान, मतमोजणी थांबवावी असं म्हणत ट्रम्प न्यायालयात पोहोचले आहेत. यामुळे निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बायडेन यांनी प्रत्येक मत महत्वाचं असल्याचं ट्विट केलं आहे. याशिवाय पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, आम्हाला आशा आहे की लवकरच 270 हा आकडा आम्ही गाठू. मात्र विजयाचा दावा आताच करणं घाईचं ठरेल. पण मतमोजणी झाल्यानंतर आम्हीच विजेते असू, असा विश्वासही बायडेन यांनी केला आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.