वॉशिंग्टन: US Election- अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक जो बायडन यांनी जिंकली आहे. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्रध्यक्ष ठरले आहेत. आज आपण या लेखात अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड झालेले डेमोक्रॅटिक जो बायडन यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत.
1. जो बायडेन हे त्यांच्या शालेयकाळात उत्तम फुटबॉलपटू होते.
2. बायडेन यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड्स श्वान आहेत. त्यांची नावे चॅम्प आणि मेजर अशी आहेत.
3. बायडेन हे मोठे कारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांनी दिलेली '67 Corvette Stingray' ही कार अजून आहे.
4. जो बायडेन पहिल्यापासून महिला अत्याचारविरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
5. 1972 च्या डिसेंबर महिन्यात बायडेन यांच्या पत्नी नेलिया आणि त्यांची 1 वर्षाची मुलगी ऍमी या दोघींचा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे.
6. पत्नी आणि मुलीच्या निधनांनतर बायडेन यांची मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍ़़डमिट असल्याने त्यांनी हॉस्पिटलमधूनच सिनेट नेतेपदाची शपथ घेतली होती.
7. लहानपणापासून बायडेन यांना बोलताना अडचणी येत होत्या. ते बोलताना बऱ्याचदा अडखळायचे.
8. वयाच्या 29 वर्षी बायडेन हे अमेरिकेतील सर्वात कमी वयाचे सिनेटर ठरले होते.
9. जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील जॉन एफ केनेडीनंतर दुसरे कॅथलिक राष्ट्रध्यक्ष ठरले आहेत.
10. बराक ओबामांच्या काळात जो बायडेन हे 8 वर्षे उपराष्ट्रध्यक्षपद भूषविले होते.
11. चॉकलेच चीप आईसक्रिम हे त्यांचं आवडतं आईसक्रिम आहे.
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.