'मी लोकांना तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी काम करणार'

joe biden victory speech
joe biden victory speech
Updated on

वॉशिंग्टन: US Election 2020: काही तासांपुर्वी अमेरिकेत डेमोक्रॅटिकचे जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बायडेन यांनी रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. या दोघांत निकालात मोठी चुरस पाहायला मिळाली होती, पण अखेरच्या क्षणी बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्रध्यक्ष ठरले आहे आहेत. 

"मला लाल राज्ये आणि निळे राज्ये दिसत नसून मला पूर्ण युनायटेड स्टेट्स दिसतोय", असं बायडेन यांनी विजयी भाषणात बोलताना म्हणाले. निळी राज्ये म्हणजे ज्या राज्यांनी बायडेन यांना साथ दिली आणि लाल राज्ये म्हणजे ज्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. बायडेन आणि कमला हॅरिस यांनी विजयी झाल्यानंतर एकत्र येऊन डेलवरमधील विल्मिग्टनमध्ये सभा घेतली, त्यावेळेस बायडन यांनी हे वक्तव्य केलं.

प्रचार यंत्रणेचे आभार-
जो बायडन (Joe Biden) विजयी भाषणात बोलताना म्हणाले की, ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभारी आहे. आम्ही जी प्रचार यंत्रणा तयार केली होती त्याचा मला अभिमान आहे. ही यंत्रणा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावी प्रचार यंत्रणा ठरली आहे.' 

अल्पसंख्यांकांचे मानले आभार-
पुढे बोलताना जो बायडन यांनी आफ्रिकन-अमेरिकनांनी मोठा पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आणि मी नेहमी तुमच्यासोबत असेन अशी ग्वाहीदेखील याप्रसंगी बोलताना बायडेन यांनी दिली. तसेच बायडन यांनी अमेरिकेतील अल्पसंख्यांकांचेही आभार मानले आहेत. 

हॅरिस यांनी बायडेन यांचे आभार मानले-
उपराष्ट्रध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनीही समर्थकांचे आभार मानले आहेत. विजयी भाषणात बोलताना हॅरिस म्हणाल्या की, तुम्ही आशा, सभ्यता, विज्ञान आणि सत्याची निवड केली आहे, कारण तुम्ही जो बायडन यांना निवडलं आहे. हॅरिस यांनी जो बायडन यांना त्यांचे रनिंग मेट म्हणून निवडल्याबद्दलही आभार मानले आहेत.

सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष-
बायडेन हे अमेरिकेचे सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष असतील. सध्या त्यांचे वय ७७ वर्षे एवढे आहे. याआधी बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना बायडेन हे उपाध्यक्ष होते. डेलावेरचे सिनेटर पद देखील त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले होते. 

हॅरिस यांचे महत्त्व- 
आता उपाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस (वय ५६) या भारतीय वंशाच्या असून त्या आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष तसेच भारतीय वंशाच्या, पहिल्या कृष्णवर्णीय आणि आफ्रिकी अमेरिकी उपाध्यक्ष असतील. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी पार पडेल 

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.