अल जवाहिरीच्या खात्म्यानंतर अमेरिकेला भीतीने पछाडले, जारी केला अलर्ट

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानामध्ये ठार केले आहे.
अल जवाहिरीच्या खात्म्यानंतर अमेरिकेला भीतीने पछाडले, जारी केला अलर्ट
Updated on

US Issue Worldwide Caution Alert : अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानामध्ये ठार केले आहे. अल-कायदाच्या म्होरक्याला मारण्याच्या यशस्वी ऑपरेशननंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही याला दुजोरा दिला होता. ही कारवाई म्हणजे 9/11 च्या हल्ल्याचा बदला असल्याचे म्हटले होते. मात्र आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेला एका नव्या भीतीने ग्रासले असून, अमेरिकेने जगभरातील आपल्या नागरिकांना अलर्ट जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अमेरिकेची कार्यालये आणि जवानांना लक्ष्य करू शकतात, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील आपल्या नागरिकांना अलर्ट जारी करत म्हटले आहे. रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर अल कायदाचे नेतृत्व जवाहिरी करत होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यामागे अल जवाहिरीची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.