वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना अमेरिकेत मात्र कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा लाखांच्या जवळ-जवळ गेला आहे. अमेरिकेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९ लाख ३६ हजार २९३ एवढी झाली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजार ५११ वर पोहोचला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाने घाईला आणले आहे. मागील २४ तासांत तर अमेरिकेत तब्बल ०२ हजार ४९४ लोकांचा बळी गेला आहे. कोविड-१९ म्हणजे कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड-१९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, लस व औषधे शोधून काढण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्न व औषध प्रशासनाने दोन आस्थापनांना लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. कोविड-१९ म्हणजे करोनावर उपचार शोधून काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. सध्यातरी कोविड १९ वर कुठलेही मान्यता प्राप्त औषध नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्यावसायिक, संशोधक व खासगी क्षेत्र यांना आम्ही उपचार शोधून काढण्यात सहभागी केले आहे, औषधे व लशी मिळून ७२ चाचण्या सुरू आहेत. २११ घटकांच्या चाचण्या नियोजन पातळीवर आहेत. त्यात विषाणूविरोधी उपचार व रक्तद्रव उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पादकांना प्रतिपिंड चाचण्यांसाठीच्या संचांची अधिकृत तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या चाचण्यांना एफडीएने परवानगी मात्र दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.