वॉशिंग्टन- हमासने इस्राइलवर हल्ला करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंडिया-मीडल इस्ट-यूरोप इकॉनॉमिक कॉरिडोर असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. या नव्या कॉरिडोरच्या घोषणेमुळे हा भाग रेल्वे, रस्ते आणि बंदरांच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. याच भीतीतून ७ ऑक्टोबरला हमासने हल्ला केला असल्याचा दावा बायडेन यांनी केला आहे.
माझ्याकडे याचे पुरावे नाहीत. माझी अंत:पेरणा मला सांगतीये की, आपण आशिया-मध्य पूर्व आणि यूरोप जोडू पाहत आहोत. या भागात दळळवळण निर्माण करु पाहात आहोत. त्यामुळे हमासने यामध्ये खोडा आणण्यासाठी हा हल्ला केला. पण, हे काम थांबणार नाही, असं जो बायडेन म्हणाले आहेत. (US President Joe Biden has hinted that one of the reasons behind Hamas attack on Israel was India Middle East Europe Economic Corridor)
अमेरिकेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅनटोनी अल्बानिज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना बायडेन यांनी हा दावा केला आहे. भारतात आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेदरम्यान भारत, अमेरिका, यूएई, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि यूरोपीयन युनियन यांनी इंडिया-मीडल ईस्ट-यूरोप इकॉनॉमिक कॉरिडोर करारावर स्वाक्षरी केली होती.
इकॉनॉमिक कॉरिडोरमुळे पूर्व आशिया, मध्य पूर्ण आशिया आणि यूरोप जोडला जाणार आहे. यातून आर्थिक विकास साध्य होणार असल्याचं बोललं जातं. यात दोन कॉरिडोर असणार आहेत. एक कॉरिडोर भारत ते मध्य पूर्व आशियाला जोडेल, तर दुसरा मध्य पूर्व आशिया ते यूरोपला जोडणार आहे.कॉरिडोरमध्ये रेल्वे रुळ, बंदर निर्मिती, रस्ते निर्मिती अशा प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
दरम्यान,इस्राइल आणि हमास युद्धाने २० व्या दिवसात प्रवेश केला आहे. इस्राइलने गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. पाच हजार पेक्षा अधिक लोकांचा यात मृत्यू झालाय. गाझावरील हल्ले तुर्तास थांबण्याचे चिन्ह नाहीत. इस्राइलने गाझामध्ये जमिनी हल्ला करण्याची तयारी सुरु केली आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.