अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी डेलावेअरच्या वेमिंग्टनमध्ये हा प्रकरा घडला. बायडेन यांच्या ताफ्याला एका कारने धडक दिली. जो बायडन आपली पत्नी जिल बायडन आणि त्याच्या कर्मचार्यांसह एक कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
राष्ट्रपतींच्या ताफ्याला टक्कर दिल्यानंतर फोर्ड कार पुढे येत होती, परंतु तेव्हा बायडन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे दाखवत त्यास घेरले. कार चालकाला हात वर करण्यास सांगण्यात आले.
यादरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन हे त्यांच्या वाहनाच्या आत धावताना दिसले. त्यांची पत्नी जिल बायडन या आधीच कारमध्ये बसलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र सध्या या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
यापूर्वी देखील बायडन यांच्या सुरक्षेत चूक
यापूर्वी सप्टेंबरमध्ये जी-20 परिषदेसाठी भारतात आलेले राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. बायडन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये दुसराच एक प्रवासी आढळला होता. कारवर हॉटेल आणि प्रगती मैदानात जाण्यासाठीचे पास लावण्यात आले होते, ते पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. चौकशीअंती ही कार आयटीसी मौर्य हॉटेलकडून प्रगती मैदानाकडे जाणार होती, मात्र त्यापूर्वीच कारचालकाने दुसऱ्या प्रवाशाला घेण्यासाठी गाडीचा वापर सुरू केला. या घटनेनंतर यंत्रणांनी चालकाला ताब्यात घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.