अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अखेर सोडलं मौन

तिथल्या जनतेमध्ये तालिबानची प्रचंड दहशत, भीती आहे. या सर्व परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले जात आहे.
JOE BIDEN
JOE BIDENFILE PHOTO
Updated on

काबूल: अमेरिकेचा अफगाणिस्तानातून (America afganistan) सैन्य माघारीचा निर्णय आणि काबुलवर तालिबानने (taliban) मिळवलेले नियंत्रण यामुळे मागच्या दोन दिवसात अफगाणिस्तानात निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगाने पाहिली. ऑगस्ट अखेरपर्यंत अमेरिकन सैन्य (American army) पूर्णपणे अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. मागच्या २० वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात तालिबान विरुद्ध लढत आहे. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन US (President Joe Biden) यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे तिथे पुन्हा एकदा तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. अफगाणि नागरिक हवालदिल झाले आहेत. तिथल्या जनतेमध्ये तालिबानची प्रचंड दहशत, भीती आहे. या सर्व परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले जात आहे. अमेरिकेवर जगभरातून टीका सुरु आहे. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या मुद्यावर मौन सोडले व आपली भूमिका मांडली.

JOE BIDEN
VIDEO : तालिबानींची दहशत, नागरिकांचा विमानाला लटकून प्रवास

राष्ट्राला उद्देशून केलेल्या १५ मिनिटांच्या भाषणात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आधी झालेल्या करारावर कायम राहायचे की, तिसऱ्या दशकाचे युद्ध लढण्यासाठी आणखी हजारो सैनिक पुन्हा पाठवायचे. यापैकी एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे" असे जो बायडेन म्हणाले.

JOE BIDEN
अफगाणिस्तान पुन्हा अंधारयुगाकडे, तालिबानची पोलादी पकड

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान बरोबर केलेला करार आपल्याला वारसामध्ये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. "अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षाकडे हा विषय जाण्याऐवजी मी सध्या होणारी टीका सहन करीन" असे बायडेन म्हणाले. "२० वर्षानंतर अमेरिका लढत असलेले सर्वात मोठे युद्ध संपवण्याची ही वेळ आहे आणि देशासाठी हा योग्य निर्णय आहे" असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.