बायडन म्हणतात; पॅलेस्टाईन वादावर द्विराष्ट्र धोरण हाच उपाय

बायडन म्हणतात; पॅलेस्टाईन वादावर द्विराष्ट्र धोरण हाच उपाय
Updated on

वॉशिंग्टन : इस्राईल पॅलेस्टाईनधील (Israel Palestine conflict) संघर्षाला युद्धविराम लागला असला इस्राईलबरोबर पॅलेस्टाईनचे अस्तित्व हाच या दोन देशांमधील वादावरील एकमेव तोडगा आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी (ता. २१) सांगितले. इस्राईलच्या संरक्षणासाठीच्या आपल्या वचनबद्घतेत कोणताही बदल झाला नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. तसेच गाझाच्या उभारणीच्या मदतीसाठी संघटित प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. इस्राईल व पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेत काल शस्त्रसंधी झाल्यानंतर बायडेन व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. जोपर्यंत या भागात इस्राईलचे अस्तित्व निःसंदिग्धपणे मान्य होत नाही, तोपर्यंत येते शांतता नांदणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांबरोबर भेट झाल्यानंतर बायडेन यांनी इस्राईल व पॅलेस्टाईनबद्दल भाष्य केले. या देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचा बायडेनविरोधी सूरही मावळलेला दिसला. (US President Joe Biden says two state solution only answer to Israel Palestine conflict)

बायडन म्हणतात; पॅलेस्टाईन वादावर द्विराष्ट्र धोरण हाच उपाय
सोशल मीडियावर 'तो' शब्द असणारा मजकूर हटवा; मोदी सरकारचं पत्र

ट्रम्प यांच्या काळात पक्षपाती धोरण

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरण हे इस्त्राईलधार्जिणे व पॅलेस्टाईनकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत होती. ट्रम्प यांचे सल्लागार आणि जावई जेरेड कुशनेर यांनी द्विराष्ट्राचा तोडगा काढला होता. पण याच्या आराखड्यात पॅलेस्टाईनला मर्यादित सार्वभौमत्व आणि इस्राईलला सुरक्षेचे अधिकार अशी आखणी केली होती. त्यामुळे पॅलेस्टॅनी नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. बायडेन यांनी मात्र काल पूर्ण विकसित दोन देशांचे अस्तित्व मान्य करण्यावर भर दिला. इस्राईलच्या सुरक्षेबाबत माझ्या वचनबद्धतेत कोणताही बदल झालेला नाही. पण दोन राष्ट्रांचा तोडगा स्वीकारणे आवश्‍यक असून एकमेव उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.

‘यूएन’कडून दोन कोटीची मदत

संयुक्त राष्ट्रा (यून)ने गाझासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीची मदत म्हणून एक कोटी ८६ लाख डॉलरची मदत दिली आहे. तसेच तीन महिन्यांत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात निधी मोहीम आखणार असल्याचे ‘यूएन’चे प्रवक्ते स्टेफनी दुजारिक यांनी सांगितले. इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धबंदीनंतर काल गाझासाठी मानव कल्याणाचे प्रमुख मार्क लोकॉक यांनी ‘यूएन’च्या आपत्कालीन मदत निधीतून ४५ लाख डॉलर दिले असल्याचे दुजारिक म्हणाले. याआधी एक कोटी ४१ लाख डॉलर एवढी मदत करण्यात आली होती. तसेच १३ ट्रक भरून अन्नधान्य, कोरोना प्रतिबंधक लशी, वैद्यकीय साधने, औषधेही ‘यूएन’ने पाठविली आहेत.

बायडन म्हणतात; पॅलेस्टाईन वादावर द्विराष्ट्र धोरण हाच उपाय
सोनिया गांधींचे ‘म्युकरमायकोसिस'बाबत पंतप्रधान मोदींना पत्र

इराणकडून पॅलेस्टाईनचे कौतुक

गाझा पट्ट्यात इस्राईलबरोबर काल झालेल्या शस्त्रसंधीबद्दल तेहरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पॅलेस्टॅनी नागरिकांचे कौतुक केले. ‘ही युद्धबंदी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या झिओनिस्ट (ज्यू चळवळ) प्रदेशावर मिळविलेला विजय असल्याचे ते म्हणाले. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावर खामेनी यांचे पत्र काल प्रसिद्ध केले आहे. गाझा संघर्षाबद्दल इस्राईल आणि त्यांचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पॅलेस्टाईनमधील हमास व पश्‍चिम आशियातील अनेक दहशतवादी संघटनांबरोबर इराणचे चांगले संबंध आहेत. पॅलेस्टाईनला भक्कम सुरक्षा व अर्थसाह्याची सध्या खूप गरज आहे. तसेच गाझात मूलभूत सुविधा पुन्हा उभारणे आवश्‍यक असून त्यासाठी मदत करण्याचे आवाहनही खामेनी यांनी मुस्लीम देशांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.