लढाईत डेमॉक्रॅटिकच्या कमला हॅरिस (Kamala Harris) आणि रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (Democratic Party) उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे. नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये हॅरिस यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये हॅरिस यांची आघाडी मोडून काढली असून अरिझोनामध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरला अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्कंठा वाढली आहे.