Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

US Presidential Election: अमेरिकेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व वाहिन्यातून होणारी प्रचारातील मुद्यांची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे.
donald trump kamala harris
donald trump kamala harrisesakal
Updated on

येत्या दहा दिवसानंतर 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होत असून, तिचे निकाल केवळ अमेरिका नव्हे, तर जगाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत. रशिया विरूद्ध युक्रेन व इस्राएल विरूद्ध पॅलेस्टाईन या दोन युद्धात अमेरिकेचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यांचे भवितव्यही या निवडणुकांवर अवलंबून असेल. 20 जानेवारी 2025 रोजी नवे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांचे शपथविधी होतील.

राजकीय निरिक्षकांनुसार, ``निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होणार आहेत. त्यांचे निकाल निर्णायकी न लागता काठावरचे लागले, तर 5 नोव्हेंबर ते 20 जानेवारी दरम्यानच्या 75 दिवसात अमेरिकेत राजकीय रणकंदन होईल, दावे प्रतिदावे होतील, राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल,’’ अशी चिन्ह आहेत.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष व उप-राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार कमला हॅरिस व टिम वाल्झ व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जे.डी.व्हान्स यांचे प्रचार टिपेस पोहोचले असून, त्यातील मुद्दे मतदारांवर बिंबविण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे.

donald trump kamala harris
Donald Trump: ''कमला हॅरिस सुमार दर्जाच्या उमेदवार'', ज्यो बायडेन यांचं नाव घेऊन ट्रम्प यांची टीका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.