Joe Biden : चीनमधील गुंतवणुकीवर अमेरिकेची बंधने; ज्यो बायडेन यांनी आदेश केला जारी

चीनमध्ये होणारी गुंतवणूक रोखण्याच्या किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कार्यकारी आदेश केला जारी.
joe biden
joe bidenesakal
Updated on

वॉशिंग्टन - अमेरिकास्थित उच्च तंत्रज्ञान कंपन्यांकडून चीनमध्ये होणारी गुंतवणूक रोखण्याच्या किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कार्यकारी आदेश जारी केला आहे. हा आदेश केवळ चीनपुरताच मर्यादित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या स्पर्धेचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बायडेन यांच्या आदेशानुसार, अत्याधुनिक संगणक चिप, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, क्वांटम तंत्रज्ञनासंबंधी माहिती आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे.

चीनमध्येही प्रचंड वेगाने तंत्रज्ञानविकास होत असल्याने अमेरिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अमेरिकेने मात्र कारण देताना, आर्थिक हित जपण्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे.

चीनबरोबर तीव्र स्पर्धा

व्यापार क्षेत्रात चीनला एकटे पाडण्याचा किंवा त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडण्याचा कोणताही विचार नाही, असे अमेरिकेने वारंवार सांगितले असले तरीही, बायडेन प्रशासनाने आतापर्यंत दिलेले आदेश हे चीनबरोबरील व्यापाराला मर्यादित ठेवणारे आहेत. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबरोबरील आयात-निर्यात शुल्क वाढविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.