काबूल: अमेरिकन सैन्य (American army) काल पूर्णपणे अफगाणिस्तानातून (afganistan) बाहेर पडलं. तब्बल २० वर्षांनी दोन दशकांच्या लढाईनंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तन सोडलं. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यामुळे त्यांची अनेक घातक शस्त्र, विमान (plane) तालिबानच्या (Taliban) हाती लागली आहेत. अशी घातक शस्त्र, विमान तालिबानच्या हाती लागल्याने जगाची चिंता वाढली होती. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाहीय.
कारण अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकन सैन्याने काबुल एअरपोर्टच्या हँगरमधील विमान, हेलिकॉप्टर आणि सैन्य वाहन निष्क्रिय, निकामी केली आहेत. त्यामुळे ही शस्त्र तालिबानच्या हाती लागूनही काही उपयोग होणार नाही. त्यांना त्याचा वापरच करता येणार नाही.
एक व्हिडीओमध्ये तालिबानी बंडखोर अमेरिकन सैन्याने मागे सोडलेलं. चिनूक हेलिकॉप्टर न्याहाळताना दिसत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, काबूल एअरपोर्ट सोडण्यापूर्वी अमेरिकन सैन्याने विमान, सैन्य वाहने आणि हायटेक रॉकेट डिफेन्स सिस्टिम निकामी केली. जेणेकरुन कोणाला त्याचा वापर करता येऊ नये.
"काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ७३ विमानांचा लष्करी कारणांसाठी वापर करता येऊ नये, अशी स्थिती करुन ठेवली आहे" असे सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितलं. "ती विमानं पुन्हा उड्डाण करु शकणार नाहीत. कोणालाही ती ऑपरेट करता येणार नाहीत. कुठल्याही मोहिमेसाठी ती उपयोगाची नाहीत" असे केनेथ मॅकेन्झी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.