USA Viral News : अमेरिकेत छेडलंय 'रॅट वॉर', कुत्र्या-मांजरांच उभारलं सैन्य, जाणून घ्या काय आहे प्रकरण

उंदरांचा सूळसूळाट वाढल्याने शहरातल्या लोकांनी वैतागून हे अभियान सुरू केले आहे.
USA Viral News
USA Viral Newsesakal
Updated on

USA Rat War Viral News : अमेरिकेची राजधानी वॉशिंगटनच्या शेजारी एडम्स मॉर्गन इथली नाइट लाइफ फेमस आहे. इथले लोक जूनच्या गर्मीत रात्र एन्जॉय करण्यासाठी जातात. पण या वातावरणाचा आनंद घेणारे फक्त हे लोक नाहीयेत, तर शहरात वेगात उंदरांची संख्या वाढत आहे. रेस्टॉरंट, बार आणि क्लबच्या मागे हे उंदरं फिरतात, कचऱ्यात फेकलेल्या उरलेल्या अन्नाला इकडे तिकडे पसरवतात.

या उंदिरांनी शहरातल्या लोकांना वैताग आणला आहे. म्हणून त्यांनी एक अभियान सुरू केले आहे. त्यांनी उंदरांना पकडण्यासाठी कुत्रे आणि मांजरी पाळणं सुरू केलं आहे. एक साप्ताहित रॅटिंग अभियाननुसार माणसांनी पाळलेल्या या प्राण्यांनी उंदरांची शिकार करत बऱ्याच प्रमाणात कमी केले आहे.

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाने एक यादी बनवली आहे. ज्यात पाच अशी शहरे आहेत ज्यांची उंदरांमुळे वाईट परिस्थिती आहे. कोरोना काळानंतर बाहेर जेवण करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे इथे उंदरांचा सुळसुळात वाढला आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार २०२२मध्ये उंदरांनी त्रासलेल्यांचे १३,४०० फोन केले गेले होते. एक वर्ष आधी ही संख्या फक्त दोन हजार होती. उंदरांची वाढती संख्या शहरात सगळीकडे कचरा पसरवत आहे.

USA Viral News
Weird Tradition Viral News : आजही या मुलींना द्यावा लागतो व्हर्जिनीटीचा पुरावा, आईच मुलीचे कपडे...

मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा उंदिर पकडण्याचे अभियान सुरू झाले तेव्हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच यात आपापले कुत्रे, मांजरी घेऊन सहभागी झाले. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभियानात सहभागी झाले. एका ६० वर्षिय रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्याला जेव्हा या अभियानाविषयी समजले तेव्हा ते आपल्या कुत्र्याला घेऊन या अभियानात सहभागी झाले.

USA Viral News
Divorce Temple Viral News : जगातलं सगळ्यात अनोखं 600 वर्ष जूनं मंदिर, महिलांशी आहे खास संबंध

त्या अधिकारींनी सांगितले की, उंदीर एवढे धीट झाले आहेत की, कुत्र्यांना बघूनही धावत नाही, त्यांचा सामना करतात. ते म्हणाले की, जेव्हा पहिल्यांदा शिकार केली तेव्हा उंदीर पळाले नाहीत. फक्त कुत्र्यांकडे बघत बसले. पण यामुळे एक गोष्ट घडली की, अपरिचित कुत्रेही एकत्र काम करू लागले. अनेक लोक या अभियानात सहभागी झाले असून त्यांनी सांगितले की तीन तासात त्यांनी साधारण ३० पेक्षा जास्त उंदिर मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.