USA News : 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची फाशीची शिक्षा होणार माफ? अमेरिकेत संतापाची लाट

USA News : दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले होते मात्र...
USA News : 9/11
USA News : 9/11sakal
Updated on

USA News : 11 सप्टेंबर 2001 रोजी अमिरिकेच्या ट्वीन टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. यावेळी 3000 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांची फाशीची शिक्षा माफ केली जाऊ शकते.असे वृत्त समोर येत आहे.

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी असून अनेकांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे.

USA News : 9/11
India - USA Friendship : भारत-अमेरिकेतील 'या' मोठ्या करारावर होणार शिक्कामोर्तब ; लष्कराची ताकद वाढणार !

अधिक माहिती आशी की, या प्रकरणात फिर्यादी आणि बचाव पक्ष यांच्यात करार झाल्याचे समजत आहे. यानुसार दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड खालिद शेख मोहम्मद आणि इतर चार जणांनी गुन्हा कबूल केला तर त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही. या संदर्भात पेंटागॉनने या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना पत्रही लिहिले आहे.

USA News : 9/11
PM Modi in USA: "कसा पकडायचा दारूचा ग्लास?" बायडेन गुरुजींनी घेतला मोदींचा क्लास; आवरेना हसू Video Viral

यामुळे पीडितांचे नातेवाईक संतापले असून एका महिला क्रिस्टीन ब्रेइटवेझर यांनी या करारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यावेळी त्या म्हणाल्या की, मला फार खूप दुःख होत आहे. मला वाटत होते कि, मी ज्या अमेरिकेत राहते इथे कायद्याचचं राज्य आहे. मात्र प्रत्यक्षात असे काही दिसून येत नाहीये.दहशदवादी हल्यात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता.

USA News : 9/11
PM Modi USA Visit : "AI हेच फ्युचर"; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर हरदीपसिंग पुरींचं महत्वाच विधान

त्याचप्रमाणे दहशतवादी हल्ल्यात आपला पुतण्या गमावलेल्या ब्रॅड ब्लॅकमन म्हणाले की, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले होते मात्र या करारामुळे हे प्रकरण कोणत्याही खटल्याशिवाय संपेल आणि 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचे सत्य कधीच समोर येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.