भारतीय सागरी हद्दीत जहाजावर हल्ला कोणी केला? अमेरिकेने घेतलं थेट एका देशाचं नाव

हिंदी महासागरातील अरबी समुद्रात भारतीय हद्दीत एका केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. यासंदर्भात अमेरिकेचा सुरक्षा विभाग पेंटागॉनने महत्त्वाची माहिती दिली आहे.
usa Pentagon says Iranian drone struck chemical tanker in Indian Ocean
usa Pentagon says Iranian drone struck chemical tanker in Indian Ocean
Updated on

नवी दिल्ली- हिंदी महासागरातील अरबी समुद्रात भारतीय हद्दीत एका केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. यासंदर्भात अमेरिकेचा सुरक्षा विभाग पेंटागॉनने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराणच्या ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इराणकडून हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता हा हल्ला झाला. एमवी केम प्लूटो जहाजावर लाईबेरियाचा झेंडा लावला होता. जहाजाची मालकी जपानी कंपनीकडे आहे. जहाज एक डच टीमकडून चालवलं जात होतं. (usa Pentagon says Iranian drone struck chemical tanker in Indian Ocean)

usa Pentagon says Iranian drone struck chemical tanker in Indian Ocean
Drone Strikes Ship: २० भारतीयांचा समावेश असलेल्या जहाजावर ड्रोन हल्ला; तटरक्षक दलाने साधला संपर्क

गुजरातच्या किनाऱ्यापासून जवळपास ३७० किलोमीटर अंतरावर जहाजावर हल्ला झाला. यावेळी अमेरिकेचे कोणतेही नौसेना जहाज जवळपास नव्हते, अशी माहिती अमेरिकेच्या सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. इस्राइल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून अमेरिकेने पहिल्यांदाच इराणचे थेट नाव घेतलं आहे.

usa Pentagon says Iranian drone struck chemical tanker in Indian Ocean
Drone Attack: इस्राइली व्यापारी जहाजावर भारतीय बंदरात ड्रोन हल्ला! नौदलानं मदतीसाठी पाठवली कुमक

इस्राइल-हमास युद्ध सुरु झाल्यानंतर तांबड्या समुद्रात समुद्री मार्गावर येमनमधील हूथी बंडखोरांकडून जहाजांना लक्ष्य केलं जात आहे. हूथी बंडखोरांना इराणचे पाठबळ मिळत आहे. याच्या जोरावर त्यांनी काही जहाजांवर मिसाईल देखील डागले आहेत.

भारतीय नौसेनेला जेव्हा हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा ते घटनास्थली पोहोचले होते. त्याठिकाणी भारताचे एक विमान पाठवण्यात आले. तसेच युद्ध नौका देखील पाठवण्यात आली होती. सर्व टीम मेंबर्स सुरक्षित आहेत. भारताने सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. दरम्यान, या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.