Video: आपण PM मोदींसोबत आहोत हेच विसरले बायडेन; फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Joe Biden PM Modi viral video: नेत्यांच्या भेटीगाठी दरम्यान एक थोडासा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. जो बायडेन हे आपल्याला कोणाची ओळख करून द्यायची आहे हेच विसरले होते.
Joe Biden PM Modi viral video
Joe Biden PM Modi viral video
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेमध्ये क्वाड देशांची परिषद भरवण्यात आली आहे. यानिमित्ताने अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना निमंत्रण दिले होते. नेत्यांच्या भेटीगाठी दरम्यान एक थोडासा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. जो बायडेन हे आपल्याला कोणाची ओळख करून द्यायची आहे हेच विसरले होते.

झालं असं की, जो बायडेन कॅन्सर संशोधना संबंधी एका कार्यक्रमात बोलताना समारोप करत होते. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्यासाठी बोलवायचे होते. पण, आपल्याला कोणाला बोलवायचं आहे हे जो बायडेन विसरून गेले. यावेळी त्यांना त्यांच्या स्टाफची मदत घ्यावी लागली. पुढचा कोण आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

Joe Biden PM Modi viral video
Viral Video : ‘असलं’ कृत्य पाहून भडकली नवरी; लग्नाच्या स्टेजवरच नवऱ्याला मारली कानाखाली, पहा व्हिडिओ 

जो बायडेन यांच्या या प्रश्नावेळी कार्यक्रमामध्ये थोडावेळ शांतता पसरली होती. नंतर स्टाफ कर्मचाऱ्याने पंतप्रधान मोदी यांचे नाव उच्चारले. मोदी खुर्चीवरून उठून जो बायडेन यांच्याजवळ गेले. यावेळी बायडेन यांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. आपले पाहुणे एका छोट्या देशातून आले आहेत. आपल्यासारखीच त्यांच्या देशात लोकसंख्या कमी आहे, असं म्हणत त्यांनी वातावरणात हलकेफुलकेपणा आणला. पण, सोशल मीडियावर या घटनेची क्लिप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जो बायडेन हे खरंच सगळं विसरले होते. पण, नंतर एक जोक मारून परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला. हे केविलवाणे आहे, असं एकाने म्हटलं. दुसऱ्या एकाने बायडेन यांची पाठराखण केली आहे. बायडेन हे विनोदी होण्याचा प्रयत्न करत होते इतकंच असं नेटकऱ्याने म्हटलं.

Joe Biden PM Modi viral video
QUAD Nations : कोणत्याही देशाला वर्चस्व गाजवू देणार नाही;‘क्वाड’ गटाचा निर्धार, चीनला अप्रत्यक्षपणे इशारा

दरम्यान, अमेरिकेमध्ये क्वाड देशांची परिषद सुरु आहे. क्वाड संघटनेमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार महत्त्वाच्या देशांचा समावेश होतो. चीनसारख्या देशांवर दबाव आणण्यासाठी चार देशांनी मिळून स्थापन केलेली ही संघटना आहे. चीनच्या प्रभावाला कमी करण्यासाठी या देशांनी मोट बांधलेली आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होण्याआधी ही परिषद होत आहे. त्यामुळे याला महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.