वॉशिंग्टन- रिपब्लकिन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेमध्ये आल्यास टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांना महत्त्वाची जबाबदारी दिले जाणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहेत. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मी जर निवडून आलो तर इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवरील ७ हजार पाचशे डॉलरचा टॅक्स रद्द केला जाईल. याशिवाय, टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना कॅबिनेटमध्ये किंवा सल्लागाराची भूमिका देण्यात येईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.