अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काल (5 नोव्हेंबर) झालेल्या निवडणुकात रिपब्लिकन उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत विजय झाला. अमेरिकेतून प्रस्तुत ब्लॉग लिहिताना त्याचे सर्वत्र पडसाद पाहावयास मिळत आहेत. मतमोजणी शेवटच्या टप्प्यात असताना ट्रम्प यांना मिळालेली 293 मते व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना मिळालेली 223 मते, ट्रम्प यांच्याकडे हुकमी बहुमत असल्याचे दर्शविते.
मत मोजणी सुरू झाली, तेव्हापासून ट्रम्प यांच्या वाढत्या मतांचा आकडा हॅरिस शेवटपर्यंत गाठू शकल्या नाही. की मतमोजणीत चढउतार झाले नाही. भारतात लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला सत्तेवर येण्यासाठी बहुमताचा आकडा 272 आहे. अमेरिकेत अध्यक्षपदासाठी तो 270 आहे.