USA Vs Iran : इराणच्या दादागिरीमुळे अमेरिकेचा संताप! अरब प्रदेशात वाढवणार लष्करी सामर्थ्य

USA, Iran
USA, Iran
Updated on

अमेरिकन सैन्य अरब प्रदेशात आपली लष्करी ताकद वाढवण्याच्या विचारत आहे. अलीकडच्या काळात अरबी समुद्रात इराणकडून अनेक व्यापारी जहाजांना त्रास दिल्याच्या घटना समोर आली आहे, ज्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आगामी काळात प्रादेशिक मित्र देशांच्या सहकार्याने अरब प्रदेशात लष्करी उपस्थिती वाढवणार असल्याचे वक्तव्य अमेरिकेने जारी केले आहे.

इराणची आखाती प्रदेशात गुंडगिरी

इराणने मागच्या दोन वर्षात खाडीतून जाणाऱ्या 15 आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना त्रास दिला किंवा त्यांच्यावर हल्ला केला. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, संरक्षण विभाग आखाती देशात आपली बचावात्मक क्षमता मजबूत करण्याचा विचार करत आहे.

त्यासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुज मध्ये प्रादेशिक शक्तींसोबत सहकार्य आणि समन्वय वाढवला जाईल. गेल्या महिन्यात इराणच्या नौदलाने पनामा येथे एक व्यापारी जहाज ताब्यात घेतल्याचा आरोप आहे, त्यामुळे तणाव वाढला होता. त्याआधीही इराणने मार्शल बेटावरून तेलाचा टँकर जप्त केला होता. त्यामुळे देखील तणाव कमालीचा वाढला होता.

USA, Iran
इतकं कमवलं तरी कसं? कोटींचा बंगला, १० गाड्या, ३० लाखांचा TV...; इंजिनिअरचा पगार मात्र ३० हजार

अमेरिका गस्त वाढवणार

बहरीन येथील अमेरिकन नौसेनीची पाचवी फ्लीट. स्ट्रेट ऑफ होर्मुझ ममध्ये गस्त वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. अमेरिकेच्या पाचव्या फ्लीटचे कमांडर व्हाईस अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की इराण बेजबाबदारपणे त्रास देत आहे आणि व्यापारी जहाजे ताब्यात घेत आहे आणि हे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय सीमेवर जहाजांचे नेव्हिगेशन आणि हालचालींव कोणता दबाव असू नये .

USA, Iran
SC News : राहुल गांधींना शिक्षा सुनावलेल्या 'त्या' न्यायधीशाचे प्रमोशन स्थगित; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

स्ट्रेट ऑफ होर्मुज का महत्वाचे आहे?

स्ट्रेट ऑफ होर्मुज हे इराण आणि ओमान यांच्यातील सीमेचा एक महत्त्वाचा चोक पॉइंट असून अरब देशांमधून जगातील अनेक देशांना या स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय जलवाहतूक कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये कोणत्याही देशाचे वर्चस्व हा गंभीर मुद्दा आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुजची लांबी 160 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि एका ठिकाणी तिची रुंदी फक्त 39 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत इराणने ही जागा ताब्यात घेतल्यास जगाच्या सागरी व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.