पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड

पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृती आणि त्यातील प्रतिकांना वारंवार लक्ष्य केलंय जातंय. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये गणपती मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रतिकाची तोडफोड करण्यात आली आहे. लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची पुन्हा एकदा नासधुस करण्यात आली आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) संघटनेशी निगडीत एका व्यक्तीवर हा पुतळा तोडण्याचा आरोप आहे.

पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड
फेसबुकनंतर ट्विटरनेही जाहीर केली तालिबानसंदर्भात आपली भुमिका; म्हणाले...
पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड
तालिबान्यांचा 'जीममध्ये वर्कआऊट', अदनान सामी भडकला

याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय की, आज लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची नासधुस करण्याच्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर तिसऱ्यांदा या प्रकारची घटना घडली आहे. अल्पसंख्याक समुदायाविरोधातील हिंसाचाराच्या घटना, ज्यात त्यांची प्रार्थनास्थळे, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि त्यांच्या खाजगी मालमत्तेवरील हल्ल्यांचा घटनांमध्ये गतीने वाढ होत आहे. अगदी गेल्या १२ दिवसांपूर्वी एका झुंडीकडून गणपती मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यामध्ये पाकिस्तानी शासनाला पूर्णपणे अपयश आलं आहे. आम्ही पाकिस्तान सरकारला त्यांच्या अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा, कल्याणाची काळजी घेण्याचं आवाहन करतो

पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड
IND vs ENG: "होय, मी चुकलो"; पराभवानंतर रूटची प्रामाणिक कबुली

लाहोर किल्ल्याच्या बाहेरील या प्रतिमेचं अनावरण २०१९ मध्ये केलं गेलं होतं. तेंव्हापासून तिसऱ्यांदा या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली आहे. याआधी दोनवेळा हा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, पांढरा कुर्ता-पायजमा आणि टोपी घातलेला एक व्यक्ती प्रतिमेची तोडफोड करत आहे. त्यावेळी तो घोषणाबाजी देखील करत आहे. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या राजकीय पक्षाशी निगडीत ही व्यक्ती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.