Oath on Bhagavad Gita: ऑस्ट्रेलियातल्या खासदाराने घेतली चक्क 'भगवत गीते'च्या साक्षीने शपथ!

India born member Australian Parliament to take oath on Bhagavad Gita: बॅरिस्टर वरुण घोष हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत.
India born member Australian Parliament to take oath on Bhagavad Gita
India born member Australian Parliament to take oath on Bhagavad GitaSakal
Updated on

कॅनबेरा- बॅरिस्टर वरुण घोष हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत. लेजेस्लेटिव्ह असेम्बी आणि लेजेस्लेटिव्ह कॉन्सिलकडून निवड झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नवे सेनेटर म्हणून वरुण घोष यांना नियुक्ती मिळाली आहे.ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटचे ते सदस्य झाले आहेत.(Varun Ghosh became the first ever India born member Australian Parliament to take oath on Bhagavad Gita)

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेन्नी वोंग यांनी वरुण घोष यांचे संसदेत स्वागत केले. त्या म्हणाल्या की, लेबर सिनेट टीममध्ये तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे स्वागत करते. आपले नवे सिनेटर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आहेत. भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे घोष हे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेटर आहेत. मी कायम म्हणते की जेव्हा तुम्ही पहिले असता, तेव्हा तुम्ही शेवटचे नाहीच याची खात्री करावी.

India born member Australian Parliament to take oath on Bhagavad Gita
'लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार...', स्टार खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल

सिनेटर घोष हे आपल्या समूदायाचा आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवतील याची मला खात्री आहे, असंही पेन्नी वोंग म्हणाल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनिज (Anthony Albanese) यांनी देखील वरुण घोष यांना शुभेच्छा दिल्या. मी वरुण घोष यांचे स्वागत करतो. नवे सिनेटर आमच्या टीममध्ये येणे ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.

India born member Australian Parliament to take oath on Bhagavad Gita
Kuwaiti Vessel in Mumbai: कुवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली; तिघांची चौकशी सुरु

वरुण घोष कोण आहेत?

वरुण घोष हे पर्थमधून वकील आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधून कायद्याची पदवी घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये फायनान्स अटोर्नी म्हणून काम केलंय. तसेच वॉशिंग्टन डिसीतील वर्ल्ड बँकमध्ये ते सल्लागार होते. ऑस्ट्रेलियाच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश करुन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.

वरुण घोष १७ वयाचे असताना त्यांचे आई-वडील ऑस्ट्रेलियात आले होते. घोष यांचा जन्म १९८५ साली झाला आहे. १९८७ मध्ये ते ऑस्ट्रेलियात आले होते. घोष चांगल्या शिक्षणाला महत्व देतात. चांगले शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे असं ते म्हणतात. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()