Turkey Bombing Video: तुर्कीये आत्मघातकी हल्ल्याचा व्हिडिओ समोर; तो कारमधून उतरला आणि थेट...

Turkey Bombing Video
Turkey Bombing Video
Updated on

अंकारा- तुर्कीयेच्या संसदेच्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यामध्ये दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. स्फोट मोठा होता. त्यामुळे काही किलोमीटर अंतरापर्यंत याचा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जातं. एक दहशतवाद्याला मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.(Turkey suicide bombing )

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन दहशतवादी कारमधून आल्याचं दिसत आहे. ते सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास संसदेच्या परिसरातील एका मंत्रालयाच्या इमारतीजवळ आले. त्यातील एक दहशतवादी मंत्रालयाच्या गेटच्या दिशेने पळतो. याच वेळी त्यांच्या अंगावर असलेल्या बॉम्बचा स्फोट होतो. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षकांना किरकोळ जखमा आल्या आहेत. त्यांना हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Turkey Bombing Video
Sunil Gavaskar : पाकिस्तान काय भारतही लिस्टमध्ये नाही... गावसकरांच्या मते कोण आहे वर्ल्डकपचा संभाव्य विजेता?

संसदेमध्ये आज राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांचा कार्यक्रम होणार होता, अशी माहिती मिळत आहे. परिसरात अनेक मंत्रालयांचे कार्यालये आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी तपास सुरु झाला आहे. परिसरात येण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. सदर घटनेमुळे खळबळ उडालीये.

राष्ट्रपती एर्दोगन म्हणाले की, दहशतवादी तुर्कीयेमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत. दोन दहशतवाद्यांनी अंकारामध्ये हल्ला केला. पण, पोलिसांनी सतर्कता दाखवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. नागरिकांना दहशतमध्ये ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण ते कधीही यशस्वी होणार नाहीत.

Turkey Bombing Video
Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! एका तासात दोन बॉम्ब स्फोट, मशिदीमध्ये आत्मघातकी हल्ला

दरम्यान, मागे नोव्हेंबर २०२२ मध्ये इस्तांबुल येथे शॉपिंग स्ट्रिटवर बॉम्बहल्ला झाला होता. यात सहा लोकांना मृत्यू झाला होता, तर ८१ लोक जखमी झाले होता.तुर्केयेमध्ये दहशतवादी सक्रीय होत असल्याचं दिसतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.