Video: 100 तरुणांनी Apple स्टोअर लुटले; तोंडावर मास्क लावून घातला राडा, पाहा व्हिडिओ

Apple
Apple
Updated on

वॉशिंग्टन- Apple चे स्टोअर लुटल्याप्रकरणी अमेरिकेच्या फिलाडेल्फिया पोलिसांनी २० अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. (Teens Loot US Apple Store In Mad Frenzy )

आरोपींनी Apple स्टोअरसह अन्य काही दुकानं लुटली होती. बुधवारी रात्री ही घटना घडली. कायदा अंमलबजावणी विभागाने १५ ते २० जणांना अटक केल्याच्या बातमीची पुष्टी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही लोक तोंडावर मास्क लावून दुकान लुटत असताना दिसत आहेत. फॉक्स न्यूज नुसार, जवळपास १०० लोकांनी या लुटीमध्ये सहभाग घेतला होता.

Apple
iPhone 15 in Pakistan : पाकिस्तानात किती रुपयांना मिळतोय आयफोन? एवढ्यात तर येईल टाटाची 'ही' कार

व्हिडिओमध्ये सर्वत्र पडलेले आयफोन, आयपॅड दिसून येत आहेत. फॉक्स न्यूज नुसार आयफोनमध्ये असलेल्या अँटी थेफ्ट वैशिष्ट्यामुळे त्यांना तेथेच सोडण्यात आलं. टोळळ्याकडून इतर काही दुकानेही लुटण्यात आली होती. सदर घडनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. सध्या पोलिसांनी जवळपास २० लोकांना ताब्यात घेतल्याचं कळतंय.

Apple
'मेड इन इंडिया' आयफोन 15 बाबत चीनमध्ये अफवा; फेकन्यूज अन् भारताविरोधात टोमण्यांचा पाऊस

दरम्यान, Apple कंपनीकडून आयफोन १५ सिरिज लॉन्च करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये एकूण चार फोन आहेत. जगभरात हे आयफोन उपलब्ध झाले असून लोकांकडून यासाठी मोठी मागणी पाहायला मिळत आहे. मुंबईच्या बीकेसीमध्ये आयफोन १५ खरेदीसाठी अनेकांनी रांगा लावण्याचं पाहायला मिळालं होतं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()