Vietnam Fire: व्हिएतनाममध्ये पुन्हा अग्नीतांडव! नऊ मजली इमारतीला भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू

vietnam hanoi fire accident update at least 50 died 70 rescued latest marathi news
vietnam hanoi fire accident update at least 50 died 70 rescued latest marathi news
Updated on

व्हिएतनामची राजधानी हनोई येथे बुधवारी स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या घटनेत तब्बल ५० लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार व्हियतनाम वत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली असून १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता एका ९ मजली इमारतीत आग लागली होती. तसेच या इमारतीत तब्बल १५० लोक राहात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी हनोई येथील ज्या इमारतीत आग लागली होती तो भाग नागरी वस्तीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आहे. मात्र आगीची घटना समजताच मोठ्या प्रणाणात बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत तब्बल ७० लोकांना सुरक्षित वाचवण्यात यश आले, ज्यापैकी ५४ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

या आगीच्या दुर्घटनेतील पीडीतांमध्ये अनेक लहान मुलांचा देखील समावेश आहे. व्हियतनाम न्यूज चॅनल्सवर ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दाखवण्यात आले. एफपीने दिलेल्या रिपोर्टनुसार इमारतीच्या लहान बालकनीला लोखंडी जाळीने बंदीस्त करण्यात आलेले होते. तसेच अपार्टमेंटमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता, ज्याखेरीज इमारतील इमरजेंसी दरवाजा देखील देण्यात आला नव्हता.

vietnam hanoi fire accident update at least 50 died 70 rescued latest marathi news
Libya Flood Update : लीबियामध्ये विनाशकारी महापूर! आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मृत्यू, १० हजार नागरिक बेपत्ता

व्हिएतनाम मध्ये एक वर्षापूर्वी कमर्शियल सेंटर हो ची मिन्ह सिटीतील तीन मजली कराओके बारला आग लागली होती, या घटनेत ३२ लोकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत १७ लोक जखमी झाले होते. तर २०१८ साली ची मिन्ह सिटीमध्ये एका अपार्टमेंट परिसरात लागलेल्या आगीत १३ जण मृत्यूमुखी पडले होते, तर याहीपूर्वी २०१६ हनोई मध्ये लागलेल्या आगीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

vietnam hanoi fire accident update at least 50 died 70 rescued latest marathi news
Mexico Aliens : मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी समोर आणले एलियन्सचे मृतदेह? व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.