मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे

३ महिने मेहनत करून ट्रुओंग व्हॅन डाओने मुलासाठी हा रणगाडा तयार केला आहे
मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे
Updated on

मुलाच्या आनंदासाठी वडील काहीही करायला तयार असतात. त्यासाठी प्रसंगी खूप कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या वडिलांनी मुलासाठी चक्क युद्धासाठी वापरला जाणारा रणगाडा तयार केला आहे. ट्रुओंग व्हॅन डाओ नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाला बसण्यासाठी बसचे लाकडी रणगाड्यामध्ये रूपांतर केले आहे. त्यात बसवून ते मुलाला फिरायला नेतात.

मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे
आनंद महिंद्राचं मोठं पाऊल, Metaverse मध्ये उभं केलं शहर!

AFPच्या वृत्तानुसार, 31 वर्षीय ट्रुओंग व्हॅन डाओ (Truong Van Dao) हनोईजवळील बेक निन्ह प्रांतात राहतात. त्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत १६ आसनी मिनीबसचे रूपांतर फ्रेंच EBR105 मॉडेलच्या लाकडी रणगाड्यामध्ये केले आहे. ट्रुओंगचा सुतारकामाचा व्यवसाय आहे. त्यांनी रणगाड्याला सामान्य कारचा आकार दिला आहे. जगातील सर्व रणगाडे त्यांच्या लाकडी रणगाड्याइतके हानीकारक नसतील तर किती मजा येईल असे तो म्हणतो.

मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे
Sports Bra खरेदी करताय! या ११ गोष्टी ठेवा लक्षात

३ महिने मेहनत करून डाओने आपल्या मुलासाठी हा रणगाडा तयार केला आहे. यासाठी त्याला ८ लाख ३३ हजार रूपये खर्च करावे लागले. तो बनविण्यासाठी त्याला आणखी दोघांनी मदत केली. या लाकडी रणगाड्यावर २.८ मीटर लांबीची तोफ आहे. त्याने मिनीबसचा मजला इंजिन म्हणून वापरला आहे. या रणगाड्याचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. यापेक्षा जास्त वेग वाढवल्यास वाहनाचे नुकसान होऊ शकते.याआधीही ट्रुओंग वॅन डाओने लाकडी कार बनवल्या आहेत. यावेळी त्यांनी 1975 च्या मूळ रणगाड्याशी संबंधित असलेला हा ऐतिहासिक रणगाडा बनवला आहे. त्याचा मुलगा आतापर्यंत प्लास्टिकच्या रणगाड्याने खेळत होता. पण त्याला हा रणगाडा पाहून आनंद झाला आहे.

मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे
रात्री झोपेत ओरडता का? अशी होईल समस्येपासून सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.