Viral News : कल्पना करा की, बायकोसोबत तुमचं कशावरून तरी भांडण झालं. तुम्ही वैतागून घराबाहेर पडतात. आणि बाहेर तुम्हाला एक पाकीट सापडतं. तसंच ते पाकीट तुम्ही उचलतात. घरात ते पाकीट पडलेलं राहतं. काही काळाने भांडणं मिटल्यावर बायको आणि तुम्ही मिळून ते पाकीट उघडतात. त्यात असं काही असतं ज्यामुळे तुमच्या हाताला घबाड लागतं. आणि हे बघून तुमची बायको चक्क बेशुद्ध होते...
पण खरंतर ही कल्पना करण्याची गोष्ट नाही तर सत्य घटना आहे. जगभरात या विषयावर चर्चा सुरू आहे.
भांडण करून बाहेर पडलेल्या या नवऱ्याला त्या पाकीटातून करडोंची संपत्ती हाती लागली. यावर विश्वास न बसल्याने काही वेळासाठी त्याची बायको चक्क बेशुद्ध पडली. वेबसाइट मेट्रो डॉट को डॉट यूकेच्या एका रिपोर्टनुसार ही घटना ऑस्ट्रेलियाच्या ओलोंगोंग इथली आहे. तिथल्या या जोडप्याला २ मिलीयन डॉलर म्हणजे साधारण १६ कोटी रुपयांपेक्षाही अधिक ची लॉटरी लागली आहे.
झालं असं की, हे जोडपं प्रत्येक आठवड्याला एक लॉटरी तिकीट खरेदी करत असे. त्यांना विश्वास होता की, ते एक दिवस नक्की श्रीमंत होतील. ते अनेक वर्षांपासून असं करत होते. एका आठवड्यात तिचा नवरा लॉटरी तिकीट खरेदी करायला विसरला. याच गोष्टीवरून त्यांच्यात भांडण झालेलं होतं.
या विषयावरून भांडण झाल्यावर नवऱ्याने ठरवलं की, पुढच्या आठवड्यात आता दोन तिकीटं खरेदी करू. त्यांनी असंच केलं. जे नंबर त्याची बायको बऱ्याच वर्षांपासून वापरत होती त्याच नंबरचे तिकीट खरेदी करण्याचं नवरा ठरवतो. मग काय, देवानेही बायकोच्या विश्वासाला दाद देत कायम ठेवलं. एकाच दिवशी या दोन्ही लॉटरी तिकीटांवर त्यांना १-१ मिलीयनची लॉटरी लागली. यावर खरतर नवऱ्याचाही विश्वास बसत नव्हता.
एका दिवसात करोडपती बनलेल्या या जोडप्याने ते खर्च करण्याचे खास नियोजन केले आहे. पहिले ते आपल्या मुलीसाठी एक घर खरेदी करणार, मग आपल्या नातवंडांसाठी काही पैसे जमा करणार आणि उरलेल्या पैशांमध्ये ते दोघं फिरायला जाणार आहेत.
महिलेला आपल्या प्रेमाच्या तारखेवर फार विश्वास होता. त्यांनी आपले अॅनिर्वसरी आणि जन्म तारखा एकत्र करून एक नंबर बनवला होता. त्या नंबरचेच तिकीट ते अनेक वर्षांपासून खरेदी करायचे. ते साधारण २० वर्षांपासून लॉटरी तिकीट खरेदी करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.