Viral Video : आईचे शब्द ऐकताच, दोन महिन्यांच्या बाळाची तत्पर प्रतिक्रिया...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
Viral Video
Viral Videoesakal
Updated on
Summary

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळतात. अशाच एका व्हिडिओमध्ये एक लहान मुलं पहिल्यांदाच बोलताना दिसतोय. लहान मुलं खूप गोंडस असतात आणि त्यांचं ते खट्याळ वागणं सगळ्यांनाच आवडतं. अशातच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक लहान बाळ जन्मल्यापासून पहिला शब्द बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. आता या गोंडस बाळाचा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

Viral Video
Viral Video : माजंरीला पाहण्यासाठी दोन पायांवर उभा राहिला कुत्रा

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आमचे दोन महिन्यांचे बाळ त्याचा पहिला शब्द बोलणार आहे." हे कॅप्शन वाचून व्हिडिओत काय घडत आहे हे समजू शकते. मुलाची आई मारिसा सॅन्ट्रोविट्झ नील यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचे पती ख्रिस आणि ती व्हिडिओमध्ये बाळाचं आवाज ऐकत आहेत, कारण त्यांचे बाळ प्रेमाने थोडेसे बडबडत असल्यासारखे दिसत आहे. पुढे तो आपला पहिला शब्द म्हणतो, तो म्हणजे : 'Hi!'

Viral Video
Viral Video : व्वा क्या बात है... एकदा गाणं ऐका फॅन व्हाल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे, ज्यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आमचे बाळ एक प्रतिभाशाली आहे." हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि आतापर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या बाळाच्या बोलण्याचे आणि गोंडस वृत्तीचे कौतुक करणे थांबवू न शकलेल्या लोकांकडूनही अनेक कमेंट आलेल्या आहेत. एका इन्स्टाग्राम युझरने कमेंट सेक्शनमध्ये विचारलं, 'मग तो आणखी काही बोललयं का?' आणखी एका युझरने लिहिलं, 'माझी 7 आठवड्यांची मुलगी आई म्हणते.' या गोंडस बाळाच्या पहिल्या शब्दावर तुमचे काय विचार आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.