Video Viral : सीईओनं झूम कॉलवरच ९०० कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता!

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Vishal Garg
Vishal Garg
Updated on

नवी दिल्ली : Better.comचे सीईओ विशाल गर्ग यांच्या झूम कॉलचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कॉलवरच त्यांनी अमेरिका आणि भारतातील आपल्या ९०० कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकलं. बेटर डॉटकॉम ही अमेरिकेतील डिजिटल फर्स्ट होम ओनरशीप कंपनी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी गर्ग यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

CNN बिझनेच्या एका वृत्तानुसार, विशाल गर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांसह झूम कॉल घेतला होता. यावेळी कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना ते म्हणाले, "जर तुम्ही या कॉलशी जोडले गेले असाल तर तुम्ही या दुर्देवी ग्रुपचे सदस्य आहात, ज्या ग्रुपची छाटनी केली जात आहे. कंपनीच्या निर्णयानुसार, आपली सेवा तात्काळ प्रभावानं समाप्त केली जात आहे. न्यूयॉर्कस्थित या कंपनीचे सुमारे १५ टक्के कर्मचाऱ्यांना कॉस्टकटिंगसाठी कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. या झूम कॉलपूर्वी देखील विशाल गर्ग यांनी काही लोकांना कंपनीतून काढून टाकलं आहे.

कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते देणार कंपनी

विशाल गर्ग यांनी सन २०१६ मध्ये बेटर डॉटकॉम ही कंपनी सुरु केली होती. अमेरिकेतून कंपनीच्या काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना चार आठवड्यांचा सेवरन्स, एक महिन्याचे भत्ते आणि दोन महिन्यांचं कव्हरअप मिळेल, यासाठी आम्ही प्रिमियम भरणार आहोत. तसेच या फायद्यांच्या डिटेलचा एचआरकडून कर्मचाऱ्यांना मेल पाठवला जाईल, असंही गर्ग यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत विशाल गर्ग

विशाल गर्ग हे 'वन झिरो कॅपिटल' या होल्डिंग कंपनीचे संस्थापक सदस्य देखील आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या गर्ग यांनी वयाच्या २१ व्या वर्षी 'मॉर्गन स्टॅनलीचा अॅनालिस्ट' प्रोग्राम सोडून प्रायव्हेट स्टुडंट लेंडर कंपनी 'माय रिच अंकल' सुरु केली होती. ही कंपनी सन २००५ मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाली होती. यानंतर या कंपनीला मेरिल लिंच यांनी खरेदी केलं होतं. यानंतर तिला बँक ऑफ अमेरिकानं टेकओव्हर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.