पाकिस्तानची सध्या कोणत्या स्थितीतून जात आहे हे आपण सर्वजन पाहत आहोत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता आपल्या सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पीओकेचे लोकही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, आपल्या देशाला आरसा दाखवण्याचे काम एका पाकिस्तानी खासदाराने केले आहे. खरं तर, पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी भारताच्या चांद्र मोहिमेचा उल्लेख करताना, भारताची प्रगती आणि कराचीतील वाईट परिस्थिती यांची तुलना केली आहे.
पाकिस्तानी खासदार म्हणाले, "आज जग चंद्राकडे वाटचाल करत असताना कराचीतील गटारात पडून आमची मुले मरत आहेत. जेव्हा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर भारत चंद्रावर पोहोचल्याची बातमी पाहतो आणि अवघ्या दोन सेकंदांनंतर कराचीत उघड्या गटारात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी येते."
कराचीमध्ये गोड्या पाण्याच्या कमतरतेचा संदर्भ देत हे खासदार म्हणाले, "कराची हे पाकिस्तानचे महसूल इंजिन आहे. देशात दोन बंदरे आहेत आणि दोन्ही कराचीत आहेत. एक प्रकारे ते देशाचे प्रवेशद्वार आहे. कराचीला 15 वर्षांपासून शुद्ध पाणी मिळाl नाही, जेव्हा जेव्हा पाणी येते तेव्हा त्याच्यावर टँकर माफियांकडून कब्जा केला जातो."
खासदार सय्यद मुस्तफा यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवरही ताषेरे ओढले. ते म्हणाले, "कराचीमध्ये 70 लाख मुले आणि पाकिस्तानमध्ये एकून 2.6 कोटीहून अधिक मुले आहेत जी शाळेत जाऊ शकत नाहीत. सय्यद म्हणाले की, कराची हे पाकिस्तानचे महसूल इंजिन असले तरी आता तेथे शुद्ध पाणीही उरले नाही.
दुसरीकडे, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे पोहोचणारे देशातील पहिले अंतराळ यान ठरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.