PM Modi : 'ग्रेट फ्रेंड ऑफ रशिया'; अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पुतिन यांच्याकडून PM मोदींचं तोंडभरून कौतुक

Vladimir Putin   PM Modi
Vladimir Putin PM Modiesakal
Updated on

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट फ्रेंड ऑफ रशिया म्हटलं आहे. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचे खास मित्रच म्हटले नाही तर याशिवाय त्यांनी मोदींच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेचेही कौतुक केले.

पुतिन म्हणाले की, भारतातील आमचे ग्रेट फ्रेंड पीएम मोदी यांनी काही वर्षांपूर्वी 'मेक इन इंडिया'ची संकल्पना सुरू केली होती. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झाला. मॉस्को येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी रशियामधील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे उदाहरण दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्याहून परतले आहेत, यानंतर लगेच पुतिन यांनी मोदींची स्तुती केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी देखील पंतरप्रधान मोदी यांना आपले चांगले मित्र म्हटले होते.मागील काही दिवसांपूर्वी पीएम मोदी अमेरिकेहून परतले आङेत. २१ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचं अमेरिकेत भव्य स्वागत करण्यात आले होते. मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

अमेरिकेच्या दौऱ्यापूर्वीच रशियाने भारताला आपला खास मित्र असल्याचे सांगितले होते. भारत अजूनही आमचा विश्वासू मित्र आहे, या भेटीचा आमच्या मैत्रीवर फारसा परिणाम होणार नाही, असे रशियन राजदूत म्हणाले होते. भारतासोबतची मैत्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवू. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

Vladimir Putin   PM Modi
युतीसरकारमध्ये होणार मोठे फेरबदल, रात्रीस खेळ चाले; २ वाजता शिंदे फडणवीस दिल्लीहून मुंबईत दाखल

या भेटीचा सर्वाधिक परिणाम रशियावर होणार असल्याचे बोलले जात होते. कारण अमेरिकेचे रशियाशी संबंध चांगले नाहीत. युक्रेन युद्धाबाबत दोघांमधील तणाव खूप वाढला आहे. युक्रेनच्या युद्धात अमेरिका पाठिंबा देत आहे, त्यामुळे रशियामध्ये तणाव आहे. रशियाशी युद्ध लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.

Vladimir Putin   PM Modi
sakal Podcast :पवारांनी घेतली फडणवीसांची विकेट ते राहुल गांधींचा मणिपूर दौरा

अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले होते की, हे युद्धाचे युग नाही. प्रत्येक समस्या बोलून सोडवता येते. युद्धामुळे लोकांना त्रास होतो. रक्तपाताने काहीही होत नाही.

रशियाकडून तेल विकत घेण्याबद्दल ही त्यांची निवड असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले होते की, भारत रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी करणे सुरू ठेवू शकतो. रशियाकडून तेल खरेदी करणे ही त्याची स्वतःची निवड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.