Russia: पुतीन यांच्यावरील हल्ल्याचा घेणार बदला ? युक्रेनच्या राष्ट्रपतीला मारण्याची दिली धमकी

ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना ठार मारण्याची धमकी दिली
Vladimir Putin Drone Strike Dmitry Medvedev Warns Elimination Of Ukraine President Zelensky
Vladimir Putin Drone Strike Dmitry Medvedev Warns Elimination Of Ukraine President Zelensky
Updated on

रशियातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. (Vladimir Putin Drone Strike Dmitry Medvedev Warns Elimination Of Ukraine President Zelensky)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने पुतिन यांच्या घरावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाकडून याला दहशतवादाचे कृत्य म्हटले असून याच्या उत्तरादाखल कारवाईचा इशारा काल देण्यात आला होता.

Vladimir Putin Drone Strike Dmitry Medvedev Warns Elimination Of Ukraine President Zelensky
Vladimir Putin News : पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न! युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा

दरम्यान, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय दिमित्री मेदवेदेव यांनी या दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही असं सागंत आता झेलेन्स्की यांना मारावे लागेल असं म्हटलं आहे.

तसेच, युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशिया समुद्राखाली असलेली केबल नष्ट करू शकतो, असे नाटोने म्हटले आहे. हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन नाटोने समुद्राखाली असलेल्या केबलची सुरक्षा वाढवली आहे.

या केबल्सद्वारे पाश्चिमात्य देशांना तेल आणि वायूचा अत्यावश्यक पुरवठा होतो. अशा परिस्थितीत रशियाने समुद्राखाली असलेल्या या केबल्सना लक्ष्य केल्यास पाश्चात्य देशांतील जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Vladimir Putin Drone Strike Dmitry Medvedev Warns Elimination Of Ukraine President Zelensky
Serbia gun fire: सर्बियातील शाळेत 14 वर्षांच्या मुलाकडून गोळीबार; 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

क्रेमलिनने बुधवारी 3 मे रोजी रात्री हे निवेदन जारी केले. या निवेदनात "काल रात्री युक्रेन सरकारने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांचे दोन ड्रोन्स हल्ला करण्यासाठी आली होती, ते रशियन सैन्याने शोधून पाडले", असे म्हटले आहे.

आम्ही या ड्रोन हल्ल्याकडे विजय दिन आणि 9 मे च्या परेडपूर्वी केलेला पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला म्हणून पाहतो. राष्ट्रपतींना लक्ष्य करणारा आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून या हल्याकडे आम्ही पाहतो. आम्ही हे स्पष्टपणे सांगत आहोत की आम्ही अशा प्रकारच्या कृत्यांमुळे घाबरणार नाही. असे क्रेमलिनने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()