रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन एका हत्येच्या प्रयत्नातून बचावले, असा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्याने केला आहे.
मॉस्को - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन एका हत्येच्या प्रयत्नातून बचावले, असा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्याने केला आहे. युद्ध अधिक तीव्र झालेले असताना आणि पुतीन यांच्या प्रकृतीवरून अफवा पसरत असताना हा खुलासा करण्यात आला आहे.
युक्रेनच्या सैन्यदलाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल कायरिलो बुडानोव्ह म्हणाले, रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसांतच कॉकेशस भागात (काळा आणि कॅस्पिअन समुद्रामधील प्रदेश) पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न असफल ठरला. पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यांच्यावर हल्लाही झाला होता, अशी माहिती कॉकेशसच्या प्रतिनिधींकडून मिळाली आहे. हा असफल ठरला तर तो झाला हे सत्य आहे.
वर्षअखेरिस युद्धसमाप्ती
गेल्या महिन्यात ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बुडानोव्ह यांनी रशियाच्या नेतृत्वात बदल होऊन रशिया- युक्रेन युद्धाला ऑगस्टच्या मध्यात कालाटणी मिळेल आणि या वर्षाअखेरिस युद्ध समाप्त होईल, असा अंदाज वर्तविला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.