Alexei Navalny Case : व्लादीमिर पुतीन सरकारला शिक्षा मिळेल ; नवाल्नींच्या पत्नीचा इशारा

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची जगभरात चर्चा सुरू आहे. अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नीने रशियावर संताप व्यक्त केला आहे.
Alexei Navalny Case
Alexei Navalny Casesakal
Updated on

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची जगभरात चर्चा सुरू आहे. अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नीने रशियावर संताप व्यक्त केला आहे. अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी खरी असेल तर पुतीन आणि त्यांच्या सरकारला, सहकाऱ्यांना त्याची शिक्षा नक्कीच मिळेल, असे युलिया नवाल्नी यांनी इशारा दिला आहे. जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूला थेटपणे पुतीन यांना जबाबदार धरले आहे.

वीस वर्षाचा तुरुंगवास भोगणारे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी (वय ४७) यांचा काल अतिसुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नीने पुतीन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना युलिया यांना रडू कोसळले.

रशियन सरकारकडून अलेक्सी यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर पूर्णपणे विश्‍वास ठेवता येणार नाही. ते नेहमीच खोटं बोलतात. परंतु ते जर खरे असेल तर पुतीन आणि त्यांचे सरकार आणि त्यांच्या मित्रांनी आमचा देश, आमचे कुटुंब आणि पतीचा जो काही छळ केला, त्यावर उत्तर द्यावे लागेल आणि तो दिवस लवकरच येईल. नवाल्नी यांच्या पत्नीने संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियाच्या ‘राक्षसी सरकार’ विरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.

‘अलेक्सी नवाल्नी यांची हत्याच’

रशियाचे शांततेचे नोबेल सन्मान विजेते दिमित्री मुरातोव्ह यांनी नवाल्नी यांचा मृत्यू ही ‘हत्या’ असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून नवाल्नी यांचा मानसिक छळ केला जात होता आणि त्यांच्यावर असे काही अत्याचार केले गेले की त्यांचे शरीर सहन करू शकत नव्हते, असे त्यांच्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याचे मुरातोव्ह म्हणाले. रशियातील विजनवासातील नेते दिमित्री गुडकोव्ह यांनी सोशल मीडियावर अलेक्सी यांचा मृत्यू ही हत्याच आहे, असा आरोप केला.

बायडेन यांची टीका

नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शोक व्यक्त केला आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, बायडेन यांनी प्रतिक्रिया देताना, नवाल्नी यांच्यासमवेत जे काही घडले ते पुतीन यांच्या क्रौर्याचा पुरावा आहे, अशा शब्दांत कठोर टीका केली. देशात आपल्याच लोकांवर भयंकर अत्याचार केले जात आहेत. बायडेन यांनी अलेक्सी यांचे कौतुक करत त्यांना ‘धाडसी व्यक्ती’ म्हणून उपाधी दिली. अलेक्सी हे तात्त्विकरुपाने आणि कायद्याचे राज्य असणाऱ्या रशियाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते.या मृत्युमागे रशियाच्या सर्वोच्च नेत्याचा हात नाही, असे म्हणता येणार नाही, असेही बायडेन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.