व्लादिमीर पुतीन यांना विष देऊन मारण्याचा कट, १००० कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

गेल्या २६ दिवसांपासून रशिया-युक्रेन दरम्यान भीषण युद्ध सुरु आहे.
vladimir putin
vladimir putinsakal
Updated on

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन अस्वस्थ आहेत. वेगवेगळ्या वृत्तांनुसार अणू हल्ल्याच्या भीतीने त्यांनी आपल्या कुटुंबाला एका भूमीगत शहरात लपवले आहे. पुतीन (Vladimir Putin) यांची धास्ती इतकी वाढली आहे, की त्यांनी आपल्या पर्सनल स्टाफचे १००० कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. कारण त्यांना वाटते की ती विष देऊन त्यांची हत्या केली जाऊ शकते. एका वृत्तानुसार पुतीन यांनी भीतीमुळे आपले शेकडो पर्सनल स्टाफला बदलले आहे. डेली स्टारच्या वृत्तात म्हटले आहे, यात पुतीन यांचा आचारी, सचिव, लाँड्रीचे काम करणारे कामगार आणि बाॅडीगार्ड्स आदींचा समावेश आहे.

vladimir putin
श्रीलंका संकटात ! नागरिकांना मिळेना पेट्रोल, कागद नसल्याने परीक्षा रद्द

गेल्या २६ दिवसांपासून रशिया-युक्रेन दरम्यान भीषण युद्ध सुरु आहे. आतापर्यंत युक्रेनची (Ukraine) राजधानी किव्ह झेलेन्स्की सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. युद्धात रशियन जनरल आणि हजारो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. एका फ्रान्सच्या एजंटने सांगितले, की रशियातील लोक सत्तापालट करुन पुतीन यांना सत्तेतून दूर करु शकतात. त्यासाठी रशियन राष्ट्रपतीची हत्या होऊ शकते. वृत्तानुसार रशियाचे (Russia) राजकीय नेत्यांनी पुतीन यांच्या जवळच्या लोकांना त्यांच्या हत्येसाठी उद्युक्त केले आहे. त्यामुळे पुतीन यांची भिती निराधार नसल्याचे दिसते.

vladimir putin
'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे'

दक्षिण कॅरोलिनचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्विट करुन पुतीन यांच्या हत्येचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, की हे सर्व संपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे पुतीन यांना बाहेर काढणे. तुम्ही हे तुमच्या देशासाठी करणार, जगासाठी करणार. फ्रान्सच्या गुप्तचर अधिकाऱ्याने दावा केला, की पुतीन यांची हत्या विष देऊन केली जाऊ शकते. रशियन सरकारला आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी विष प्रयोगासाठी ओळखले जाते. फ्रेंच प्रतिनिधीने डेली बीस्टला सांगितले, की हा प्रयत्न क्रेमलिनच्या आतून होऊ शकतो. रशियन गुप्तचर यंत्रणा ही विरोधकांना संपवण्यासाठी विष प्रयोग करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.