नवी दिल्लीः रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. रशियाकडूनही सातत्याने भारताला एक चांगला मित्र समजलं गेलं आहे. त्यामुळे जगातलं एक भयाण युद्ध रोखण्यासाठी रशियाला भारताकडून अपेक्षा आहेत.