युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की एकेकाळी होते स्टँडअप कॉमेडियन

राजकारणात येण्याआधी झेलेन्स्की स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून काम करायचे.
Volodymyr Zelensky was stand up comedian
Volodymyr Zelensky was stand up comedian
Updated on

Who is Volodymyr Zelensky: रशिया आणि युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धादरम्यान त्या त्या देशांच्या राष्ट्रपतीची भूमिका खूप महत्वाची ठरते आहे. दोघांविषयी खूप माहिती व्हायरल होते आहे. पण या युद्धात चर्चा होतेय ती एका कॉमेडियनची. हा कॉमेडियन कोण? त्याचा युद्धाशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे कॉमेडियन म्हणजे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की. त्यांचा कॉमेडीशी काय संबंध असाही प्रश्न पडला असेल. पण राजकारणात येण्याआधी झेलेन्स्की स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून काम करायचे.

Volodymyr Zelensky was stand up comedian
Ukraine-Russia Crisis : रशिया युक्रेनमध्ये कोण सरस! जाणून घ्या दोघांची लष्करी ताकद

झेलेन्स्कींकडे टीव्हीवर केलेल्या भूमिका सोडल्या तर राजकारणाचा अनुभव नाही. त्यांनी निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेक उत्तम भाषणे दिली होती. पण भाषण दिल्याने कोणी नेता बनत नसतो. पण हे घडलं कसं? एका कॉमेडियनचा राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. लोकप्रिय स्टॅडअप कॉमेडियन असलेल्या व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचा जन्म २५ जानेवारी १९७८ साली युक्रेनच्या क्रिवी रिह येथे झाला. त्यांचे वडील अलेक्झांडर झेलेन्स्की क्रिवी रिह इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स येथे सायबरनेटिक्स आणि कॉम्प्युटिंग हार्डवेअर विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक होते. त्याची आई रिम्मा इंजिनिअर होती. झेलेन्स्की यांनी क्रिवी रिह इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याची पदवी घेतली आहे. 6 सप्टेंबर 2003 रोजी ओलिनाशी लग्न केले. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.

Volodymyr Zelensky was stand up comedian
'माझे मित्र विमानतळावर पोहोचताच बॉम्बस्फोट झाला अन्...' विद्यार्थिनीनं मांडली व्यथा
Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky

चित्रपटातही केले काम

कायद्याच्या अभ्यासाबरोबरच झेलेन्स्की हे कॉमेडी शोजमध्ये भाग घेत असत. १७ वर्षांचे असताना झेलेन्स्की एका स्थानिक विनोदी स्पर्धेच्या टीममध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना लवकरच युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यात १९९७ साली त्यांनी के मेजर लीगमध्ये काम करून जिंकले. २००८ साली त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केले. २०११ मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही काम केले.

Volodymyr Zelensky was stand up comedian
भीतीदायक! 'युक्रेन'साठी प्रियंका चोप्राची भावुक पोस्ट,मदतीचं आवाहन

टिव्ही शोमुळे बदलले आयुष्य

Servant of the People या टिव्ही शोने त्यांचे आयुष्य बदलले. हा शो २०१५ ते २०१९ या काळात हा शो युक्रेनमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमात झेलेन्स्कींनी राष्ट्रपतीची भूमिका केली होती. तसंच त्यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या भूमिकेत ते भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवतात, त्यांचे भ्रष्टाराचाविरोधातील भाषण प्रचंड व्हायरल होते आणि काही काळानंतर त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड होते, असे दाखवले होते. हा शो लोकांना प्रचंड आवडला. त्यामुळे अभिनेता व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना देशाच्या राजकारणात यावे लागले.

अनिल कपूरच्या नायक चित्रपटासारखी व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची कथा आहे. या नाटकाच्या नावाचा वापर करत त्यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव 'Servant of the People' अर्थात लोकांचे सेवक असे ठेवले. झेलेन्स्की यांना टीव्ही शोमध्ये साकारलेल्या भूमिकेशिवाय राजकारणाचा कोणताही अनुभव नव्हता. पण, त्याच्या निवडणूक भाषणांमुळे युक्रेनचे लोक खूप प्रभावीत झाले. परिणामी झेलेन्स्कींनी प्रचंड विजय मिळवला आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले.

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin
Volodymyr Zelensky y- Vladimir Putinesakal

राजकारणाचा अनुभव नाही

आता परिस्थिती अशी आहे की युक्रेन आणि रशिया यांच्यातील या लढतीत एकीकडे स्टँड-अप कॉमेडियन आणि राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की असून ज्यांना राजकारणाचा फार अनुभव नाही, तर दुसरीकडे बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांच्यानंतर जगातील दुसरे सर्वात जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहिलेले व्लादिमीर पुतिन आहेत.

राजकारणी असण्यासोबतच पुतिन हे रशियाची गुप्तचर संस्था केजीबीचे अधिकारीही होते. जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन जीव धोक्यात घालून आपल्या देशासाठी गुप्तचर कारवाया करत होते, तेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्टँड-अप कॉमेडीने लोकांचे मनोरंजन करत होते. युद्ध असेचव वाढत राहिले तर युक्रेनचे अस्तित्व टिकणे कठीण आहे. पण, या सगळयात . स्टँड-अप कॉमेडियनपासून राष्ट्रपतीपर्यंत व्होलोदिमिर झेलेन्स्कींचा प्रवास थक्क करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.