इम्रान खान पंतप्रधानपदी राहणार ? अविश्वास ठरावावर ३ एप्रिलला मतदान

३ एप्रिलला ठरणार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नशीब
Pakistan PM Imran Khan
Pakistan PM Imran Khanesakal
Updated on

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. संसदेत या प्रस्तावावरील चर्चेच ३१ मार्चपासून सुरुवात होईल. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री शेख रशीद अहमद यांनी मंगळवारी (ता.२९) याबाबत माहिती दिली. मंत्र्यांनी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना समर्थन असल्याचे अधोरेखित केले आहे. त्या बरोबरच त्यांनी सत्ताधारी पक्ष 'पीटीआय'ला (PTI) पाठिंबा देण्यासाठी 'पीएमएल-क्यू' मध्ये कोणतेही वाद किंवा मतभेदाविषयी आलेले वृत्तही फेटाळले. रशीद यांनी 'पीएमएल-क्यू'च्या निर्णयाचे कौतुक करत म्हणाले, की 'एमक्यूएम-पी'ही सरकारला पाठिंबा देईल. सुरक्षा दलांनी घातपाताच्या उद्देश असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. (Voting On No Confidence Motion Against Pakistan PM Imran Khan On 3 April)

Pakistan PM Imran Khan
तानाजी सावंत नाराज ? ठाकरेंच्या आदेशानंतरही शिवसंपर्क अभियानात गैरहजेरी

त्यांच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी न्यायालयांमध्ये खटला चालवला जाईल. प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या रॅलीतील मोठ्या प्रमाणावरील गर्दी सांगते की पूर्ण देश इम्रान खान यांच्याबरोबर उभा आहे.

Pakistan PM Imran Khan
लक्षणे नसताना चीनचे नागरिक होतायत कोरोनाबाधित, शांघायमध्ये लाॅकडाऊन

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत एकूण १६१ मतांनी सादर केला गेला. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत कार्यवाही स्थगित करण्यात आली. इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी ८ मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. विरोधकांना पूर्ण विश्वास आहे, की त्यांचा प्रस्ताव पारित होईल. कारण पीटीआयचे अनेक खासदार इम्रान खान यांच्या विरोधात समोर आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()