Vulcan Rocket Launch : तब्बल पन्नास वर्षांनंतर अमेरिकेची चांद्रमोहीम

अमेरिकेतील युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे आज चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आले.
vulcan rocket launch
vulcan rocket launchsakal
Updated on

केप कॅनव्हेराल (अमेरिका) - अमेरिकेतील युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे आज चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटद्वारे ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे लँडर अवकाशात पाठविण्यात आले आहे. सुमारे ५० वर्षांच्या खंडानंतर अमेरिकेने चांद्रमोहिम आखली आहे.

अमेरिकेमध्ये सध्या अवकाश क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘व्हल्कन’ रॉकेटचे आज पहाटे फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. त्यातील लँडर हा २३ फेब्रुवारीला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचे नियोजन आहे.

ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्रावर यान अथवा लँडर उतरविणारी ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ ही खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी असेल. अशी कामगिरी आतापर्यंत केवळ चार देशांच्या सरकारी अवकाश संस्थांना शक्य झाली आहे. या मोहिमेसाठी ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ आणि ‘युनायटेड लॉन्च अलायन्स’ या कंपन्यांना ‘नासा’ने मदत केली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्याची अखेरची मोहीम अमेरिकेने १९७२ मध्ये आखली होती. ‘नासा’च्या ‘अपोलो १७’ या यानातून गेलेल्या जिनी कार्नन आणि हॅरिसन श्‍मिट यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते अनुक्रमे ११ वे आणि १२ वे व्यक्ती ठरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()