वॉरेन बफेट यांची 74 हजार कोटी रुपयांची एक चूक, याआधीही केल्यात मोठ्या मिस्टेक

warren buffett.
warren buffett.
Updated on

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफे यांच्याकडूनही अनेक मोठ्या चुका होतात. शिवाय ते वॉरेन बफे असल्याने त्यांच्या छोट्या चुका मोठ्या नुकसानीच्या ठरतात. शनिवारी 30 वर्षाच्या बफे यांनी आपली कंपनी बर्कशायर हॅथवेच्या (Berkshire Hathaway Inc)  शेअर होल्डर्संना लिहिलेल्या पत्रात अशाच एका चुकीचा उल्लेख केलाय. बर्कशायर हॅथवेने 2016 साली एअरक्राफ्ट आणि इंडस्ट्रियल पार्ट बनवणारी कंपनी प्रिसिजन कास्टपार्ट्स कॉर्पोरेशन (Precision Castparts Corp) विकत घेतली होती. त्यांनी PCC खरेदी करण्यासाठी मोठा खर्च केला असल्याचे मान्य केले आहे. 

वॉरेन बफे यांनी पीसीसीला 2016 मध्ये 32.1 अब्ज डॉलरला खरेदी केले होते. मागील वर्षी पीसीसीची किंमत 9.8 अरब डॉलर म्हणजे 74 कोटीने कमी झाली आहे. कोरोना महामारीचा फटका कंपनीला बसला आहे. वॉरेन म्हणालेत, की ते कंपनीपासून होणाऱ्या लाभाचा योग्य अंदाज लावू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी चुकीचं कॅल्कुलेशन केलं आणि जास्त किंमतीला पीसीसीला खरेदी केलं. त्यामुळे त्यांना आज नुकसान सहन करावे लागत आहे. 

बफे यांनी लिहिलंय की, त्यांनी एक चांगली कंपनी खरेदी केले. आपण भाग्यवान आहोत की पीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क डोनेमन अजूनही इन्चार्ज आहेत.  पण, त्यांनी असंही स्पष्ट केलं की त्यांना पीसीसीकडून अधिक सकारात्मक निकालाची अपेक्षा होती. पीसीसीने 2020 मध्ये जवळपास 40 टक्के म्हणजे 13,400 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. त्यामुळे आता कुठे नफा होण्यास सुरुवात झाली आहे. 

वॉरेन बफे यांनी याआधीही केल्यात मोठ्या चुका

वॉरेन बफे यांनी त्यांच्या चुका कबुल करण्याचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी क्राफ्ट फू़ड्सला जास्त किंमत देऊन खरेदी केले होते. 1993 मध्ये त्यांनी Dexter Shoe ला खरेदी केले होते. त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात वाईट डील सिद्ध झाली. यामधून त्यांना काहीही उत्पन्न मिळाले नाही. शिवाय त्यांनी ही डील बर्कशायर हॅथवेचे शेअर देऊन केली होती. त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.