Narendra Modi : पंतप्रधान मोदींसाठी बायडेन दाम्पत्याकडून विशेष भोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष भोजन समारंभाचे आयोजन करण्याचा विचार अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल हे करत आहेत.
Narendra Modi and Joe Biden
Narendra Modi and Joe Bidensakal
Updated on

वॉशिंग्टन - पुढील आठवड्यापासून अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष भोजन समारंभाचे आयोजन करण्याचा विचार अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल हे करत आहेत.

मोदींच्या स्वागतासाठी सरकारतर्फे आयोजित केलेल्या औपचारिक भोजन समारंभाच्या एक दिवस आधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार असल्याचे ‘व्हाइट हाऊस’मधील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

Narendra Modi and Joe Biden
BBC Modi Documentary: भारतात बॅन, पण अमेरिकेत दाखवली जाणार BBC ची डॉक्युमेंटरी; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच...

ज्यो बायडेन आणि जिल बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी यांच्या या अमेरिका दौऱ्यात अनेक कार्यक्रम आखण्यात आले असून त्यामध्ये २२ जून रोजी साउथ लॉन्स येथे भव्य स्वागत समारंभ होणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी भोजनाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.

बायडेन दाम्पत्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भोजन समारंभाचे ठिकाण जाहीर करण्यात आलेले नाही. औपचारिक भोजनावेळी उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांची यादी त्या दिवशी सायंकाळी जाहीर करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने द्विपक्षीय संबंधांतील प्रमुख घटक असणाऱ्या दोन्ही देशांतील व्यक्तींना आमंत्रित केले जाते.

औपचारिक भोजनासाठी सरकारी पास मिळविण्यासाठी ‘व्हाइट हाऊस’मध्ये रोजच अनेक जणांकडून विचारणा होत आहे. पासची विनंती करण्यासाठी मला फोन आला नाही, असा एकही दिवस गेला नाही. त्यामुळे हा समारोह खूपच चांगला होणार असून, दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल,

Narendra Modi and Joe Biden
Joe Biden : ...अन् 'ती' जो बायडेनसमोरच टॉपलेस झाली; 'व्हाईट हाऊस'मध्ये नेमकं काय घडलं?

हॅरिस यांच्याकडूनही भोजन

परराष्ट्र विभागाच्या फॉगी हेडक्वार्टरमध्ये २३ जून रोजी उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. मोदी यांच्या विनंतीनुसार, त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात ते तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग यांसह इतर अनेक क्षेत्रांतील व्यक्तींची भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.