आमच्या देशात दहशतवादी नकोत : पुतीन

रविवारी त्यांनी युनायटेड रशिया या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
putin
putinsakal
Updated on

मॉस्को : अफगाणिस्तानमधील (afghanistan) निर्वासितांना मध्य आशियातील देशांत तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवण्याच्या पाश्चात्त्य देशांच्या निर्णयावर रशियाचे (russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी टीका केली आहे.

रशियाच्या सुरक्षिततेविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. रविवारी त्यांनी युनायटेड रशिया या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, पाश्चात्त्यांचा दृष्टिकोन अपमानास्पद आहे. मध्य आशियाई देश आणि रशिया यांच्यातील करारानुसार व्हिसाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे निर्वासितांच्या नावाखाली दहशतवादी आमच्या देशात येण्याचा धोका आहे. १९९० आणि दोन हजार या दशकांच्या मध्यास झालेल्या प्रकारांची आम्हाला थोडी सुद्धा पुनरावृत्ती नको आहेत.

putin
अफगाणिस्तानमध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा, अनेकजण बंदी

त्यावेळी उत्तर कॉकेशस प्रांतात अस्थिरता आणि शत्रु़त्व निर्माण झाले होते.अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांत हजारो नागरिक जमले आहेत. मायदेशातून बाहेर पडण्यास ते अधीर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.