Weird Festival : चिमुकल्यांना गादीवर झोपवून मारल्या जातात अंगावरून उड्या, काय आहे ही परंपरा?

ही धार्मिक प्रथा १६०० च्या दशकाच्या सुरूवातीपासून चालत आलेली आहे.
एल कोलाचो परंपरा
एल कोलाचो परंपराSakal
Updated on

फक्त एका वर्षाच्या लहान मुलांना गादीवर झोपवलं जातं, त्यांच्यावरून उड्या मारल्या जातात, त्यांच्यावर ओरडलं जातं आणि हे सर्व या चिमुकल्यांच्या आईवडिलांसमोर घडतं. ही प्रथा आहे स्पेन मधील एल कोलाचो या उत्सवाची. ईस्टरच्या ६० दिवसानंतर हा उत्सव सजरा केला जातो. तर ही धार्मिक प्रथा १६०० च्या दशकाच्या सुरूवातीपासून चालत आली असल्याची माहिती आहे. नेमकं काय आहे ही परंपरा जाणून घेऊया...

एल कोलाचो परंपरा
एल कोलाचो परंपराSakal

येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या दुर्भाग्याला दूर सारण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले लोकं या लहान लहान मुलांवर ओरडत असतात. त्यानंतर मुलांवर गुलाबाच्या पाकळ्या फेकल्या जातात आणि आईवडील या मुलांना आपल्या ताब्यात घेतात.

एल कोलाचो परंपरा
एल कोलाचो परंपराSakal

थरारक प्रदर्शनामध्ये वेशभूषा धारण केलेले पुरूष या लहान मुलांवरून उड्या मारतात, असं मानतात की, राक्षस या मुलांच्या पापांना शोषित करतो आणि रोगराई आणि दुर्भाग्यापासून वाचवतो.

एल कोलाचो परंपरा
एल कोलाचो परंपराSakal

या उत्सवादरम्यान, लाल आणि पिवळे मुखवटे घातलेले लोक रस्त्यावरून "डेविल" म्हणून धावतात आणि गावकऱ्यांचा अपमान करतात. त्याचबरोबर काठ्या जोडलेल्या घोड्याच्या शेपटीने मारहाण करतात.

एल कोलाचो परंपरा
एल कोलाचो परंपराSakal

एल कोलाचो हा सण 1620 सालापासून कॉर्पस क्रिस्टीच्या मेजवानीनंतर रविवारी साजरा केला जातो. हा उत्सव कसा सुरू झाला याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही पण प्रजनन विधी म्हणून ही परंपरा सुरू झाली असावी असं इतिहासकारांचं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.