‘धान्य टंचाईला पाश्‍चिमात्य देश दोषी’ - व्लादिमीर पुतीन

जगभरात जो धान्‍याचा व विजेच्या तुटवडा निर्माण झाला
Western countries blame grain shortages Vladimir Putin crisis in global food grain market Moscow
Western countries blame grain shortages Vladimir Putin crisis in global food grain market Moscowsakal
Updated on

मॉस्को : जगभरात जो धान्‍याचा व विजेच्या तुटवडा निर्माण झाला आहे, त्याला पाश्‍चिमात्य देश दोषी असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. जागतिक अन्नधान्य बाजारात सध्या जे संकट निर्माण झाले आहे, त्याची जबाबदारी रशियावर ढकलली जात असल्याचे आम्ही पाहत आहोत. आमचे नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे समस्यांची जबाबदारी आजाऱ्याकडून निरोगीकडे देण्यासारखे आहे, असेही पुतीन म्हणाले.

पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळेच धान्याची टंचाई निर्माण झाली व किमतीत वाढ झाली असून जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप पुतीन यांनी ‘रशियन टीव्ही’शी बोलताना केला, असे येथील सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने म्हटले आहे. कोरानाच्या साथकाळात डॉलरची अभूतपूर्व टंचाईमुळे महागाई वाढली. पारंपारिक ऊर्जा पुरवठ्याच्या पर्यायांमध्ये कमी गुंतवणूक होण्यामागे आणि किमतीत वाढ होण्यामागे युरोपची अदूरदर्शी धोरणे आहेत, असा दोष पुतीन यांनी दिला. युक्रेनमधून धान्याची वाहतूक रशियाने रोखलेली नाही. तरीही पाश्‍चिमात्य देश त्यांच्या समस्यांसाठी रशियाला बळीचा बकरा करीत आहेत. जर पाण्यातील स्फोटके काढली तर युक्रेनमधून धान्यवाहतूक करणारी जहाजे रशिया रोखणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिला स्फोटके काढून घेतानाच्या परिस्थितीचा फायदा आम्ही सागरी हल्ले करण्यासाठी घेणार नाही, असे पुतीन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.